Facebook: COVID-19 बद्दल चुकीची माहिती देणाऱ्या 1.8 कोटी पोस्ट फेसबुकने हटवल्या
Facebook | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीबद्दल चुकीची माहिती अथवा पोस्ट शेअर करणाऱ्या शेकडो युजर्वर फेसबुकने (Facebook) कारवाई केली आहे. कोविड-19 विषाणूबद्दल चुकीची आणि आक्षेपार्ह माहिती पसरवून आपल्या तत्वांविरोधात जागतीक पातळीवर मुख्य मंचावरुन आणि इन्स्टाग्रामवरुन उल्लंघन करणाऱ्या सुमारे 1.8 कोटी पेक्षा अधिक पोस्ट फेसबुकने हटवल्या आहेत. सोशल नेटवर्कवरुन महामारीच्या सुरुवातीला या वर्षाच्या एप्रिल महिन्यांपर्यंतचे अशा प्रकारचे मजकूर हटविण्यात आले आहेत. फेसबुक कंपनीने आपल्या पहिल्या तिमाहीच्या कम्युनिटी स्टैंडर्ड इनफॉर्समेंट रिपोर्ट (Community Standards Enforcement Report) मध्ये म्हटले आहे की, 'आम्ही लस स्वीकृती वाढविण्यासाठी आणि लसीकरणाबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्यांपासून बचाव करण्यासाठीही काम करत आहोत.'

सोशल मीडियातील दिग्गज कंपनी फेसबुकने या आधी बुधवारी आपल्या कोविड-19 तत्वांचाही विस्तार केला. ज्यात भारतात आवश्यक कोरोना व्हायरस संबंधित अपडेट्स सामायिक करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासित प्रदशांना आरोग्य विभागांना एक टूलचा समावेश आहे. फेसबुकवर वीपी इंटीग्रिटी गाय रोसेननुसार हसर्वात उपयोगी मीट्रिकपैकी एक आहे की, लोकांनी किती वेळा या मंचाच्या माध्यमातून आपत्तीजनक आशय, मजकूर पाहिला. फेसबुकवरुन अभद्र भाषेचा वापर रोखण्यासाठी वारंवार काम सुरु आहे. (हेही वाचा, WhatsApp Pink Installation Link चे मेसेजेस Malware!सुरक्षित राहण्यासाठी काय कराल? घ्या जाणून)

रोसेन यांनी म्हटले की, पहिल्या तिमाहीत 0.05-0.06% राहिले. 10,000 व्यूज वर 5 ते 6 वेळा पाहिले गेले. आम्ही आमच्या मंचावरुन अभद्र भाषा प्रसार कमी करण्यासाटी सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आम्ही आमच्या मंचावरुन सामायिक केल्या जाणाऱ्या मजकूर, आशयावर बारीक लक्ष ठेवतो. काही आक्षेपार्ह आढळले तर आम्ही ते काढून टाकतो. फेसबुकने पहिल्या तिमाहीत 88 लाख चुकीच्या आणि आक्षेपार्ह मजकूर, आशयावर कारवाई केली. जी 2020 च्या तिसऱ्या तिमाहीच्या 63 लाखांहून अधिक आहे.