BSNL च्या नव्या प्लॅनमध्ये IPL फॉलोअर्सना मिळणार जबरदस्त सुविधा
BSNL Plans (Photo Credits: Twitter)

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) या कंपनीने नव्या प्लॅन्सची घोषणा केली आहे. या प्लॅनमध्ये IPL फॉलोअर्संना जबरदस्त सुविधा देण्यात येणार आहेत. बीएसएनएलने 199 रुपये/ 201 रुपये आणि 499 रुपये असे दोन प्लॅन्स लॉन्च केले आहेत. ट्विट करत कंपनीने या नव्या प्लॅन्सची माहिती दिली आहे. पाहुया कसे आहेत हे दोन प्लॅन्स आणि त्यातून मिळणारे फायदे...

BSNL India ट्विट:

प्लॅन्सचे फायदे:

# आयपीएल सामन्यांचे अपडेट्स मिळणार.

# सामन्यांचा स्कोअर बोर्ड कळणार.

# तसंच फोनमध्ये रिंग बॅक टोन सर्व्हिसही उपलब्ध होणार आहे.

# मात्र या सुविधांचा लाभ घेण्यासाठी बीएसएनएल अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करावं लागेल. या दोन्हीही प्लॅनद्वारे सामन्याची माहिती SMS अलर्टच्या माध्यमातून प्रत्येक 15 ते 20 मिनिटांनी मिळेल. तसंच यात कॉल आणि डेटाची सुविधाही दिली जाईल.

BSNL चा 199/201 रुपयांचा प्लॅन

यात युजर्सला अनलिमिडेट व्हाईस कॉलिंगची सुविधा मिळेल. लोकल आणि एसटीडी या दोन्ही नंबरवरही सुविधा मिळेल. त्याचबरोबर दररोज 1 जीबी डेटा मोफत मिळेल. याची व्हॅलिडीटी 28 दिवासांची आहे.

BSNL चा 499 रुपयांचा प्लॅन:

या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉलिंगची सुविधा मिळते. ही कॉलिंगची सुविधा आपल्याला ऑननेट आणि ऑफनेट दोन्ही नेटवर्कवर उपलब्ध आहे. यात दररोज 1 जीबी डेटा मोफत दिला जाईल. याची व्हॅलिडीटी 90 दिवसांची आहे.