Boat Flash Watch अखेर भारतात लाँच, राउंड डिस्प्ले असलेल्या या स्मार्टवॉचची काय आहेत खास वैशिष्ट्ये आणि किंमत?
Boat Flash Watch (Photo Credits: Twitter/Amazon)

Boat कंपनीने भारतात आपले नवे स्मार्टवॉच (Smartwatch) लाँच केले आहे. Boat Flash Watch असे या स्मार्टवॉचचे नाव असून यात 10 स्पोर्ट्स मोड आणि अनेक हेल्थ फिचर्स दिले आहेत. राउंड डिस्प्ले असलेल्या या स्मार्टवॉचची किंमत 2,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टवॉच एक्टिव ब्लॅक, इलेक्ट्रिक ब्लू आणि विविड रेड अशा तीन रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. साउंडच्या बाबतीत आपल्या गॅजेट्समधून अफलातून प्रदर्शन देणा-या बोट कंपनीचे हे स्मार्टवॉच देखील खूपच जबरदस्त आहे. या स्मार्टवॉचची टक्कर या रियलमी, Noise या स्मार्टवॉचशी होईल.

Boat Flash Watch च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात 33mm चा राउंड LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात स्लिम मॅटेलिक डिझाईनसह ड्युअल टोन सिलिकॉन स्ट्रॅपसह लाँच करण्यात आला आहे.हेदेखील वाचा- Boat Rockerz 255 Pro+ वायरलेस ईयरफोन्स भारतात लाँच, काय आहेत याची खास वैशिष्ट्ये

Boat हे लेटेस्ट स्मार्टवॉच SpO2 मॉनिटर, 24/7 हार्ट रेट मॉनिटर दिले गेले आहे. या स्मार्टवॉचमध्ये 10 स्पोर्ट्समोड ज्यात Walking, Running, Cycling, Climbing, Yoga, Basketball, Football, Badminton, Skipping, Swimming यांचा समावेश आहे.

Boat Flash Watch च्या बॅटरीविषयी बोलायचे झाले तर यात सिंगल चार्जवर 7 दिवसांची बॅटरी लाईफ दिली आहे. Boat Flash स्मार्टवॉचमध्ये 200mAh ची बॅटरी दिली गेली आहे, जी 2 तासांत 0 ते 100 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. या स्मार्टवॉचमध्ये चार्जिंगसाठी लि मॅग्नेटिक चार्जिंग दिला गेला आहे.

Boat Flash Watch मध्ये IP68 रेटिंग दिले गेले आहे. या स्मार्टवॉचमध्ये 6 वॉच फेस दिले गेले आहे. यामुळे यूजर्स स्मार्टफोनमधील म्यूजिक आणि कॅमेरा कंट्रोल करु शकतात. कनेक्टिव्हिटीसाठी यात Bluetooth v5.0 दिला गेला आहे. जो 10m रेंजसह येतो. या स्मार्टवॉचमध्ये युजर्सला कॉल अलर्टसुद्धा मिळतो.