Boat Airdopes 621 ईअरफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत
Boat Airdopes 621 (Photo Credits-Twitter)

Boat चे शानदार Airpods 621 टू वायरलेस स्टेरिओ ईअरफोन भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत. या ईअरफोनच्या बॅटरी संदर्भात असा दावा करण्यात आला आहे की, 150 तासांचा बॅकअप दिला जाणार आहे. ऐवढेच नव्हे तर या ईअरफोनचे कवर पॉवर बँकच्या रुपात उपयोग करु शकतात. अन्य फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास Airpods 621 मध्ये गुगल सिरी वॉइस असिस्टंटसह बेस ड्रायव्हर्स, ब्लूटुथ वर्जन 5.0 आणिIWP तंत्रज्ञानाचा सपोर्ट मिळणार आहे.(तब्बल 7 हजार रुपयांनी स्वस्त झाला Oppo कंपनीचा 'हा' जबरदस्त स्मार्टफोन!) 

स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास, Boat Airpods 621 मध्ये टच कंट्रोल व्यतिरिक्त फास्ट पेअरिंगसाठी IWP तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या ईअरफोनमध्ये शानदार साउंडसाठी 6mm मध्ये कॉयल ड्रायवर्स दिले गेले आहेत. तसेच ईअरबड्स IPX7 ची रेटिंग मिळाले म्हणजेच वॉटरप्रुफ आहे. त्याचसोबत 35mm ची बॅटरी दिली गेली आहे. याच्या कवरमध्ये 26000mAh ची बॅटरी मिळणार आहे. कंपनीने दावा केला आहे की, सिंगच चार्जमध्ये 5.5 तासांचा बॅकअप मिळणार आहे. तर ईअरबड्स संपूर्ण चार्ज होण्यासाठी एका तासांचा वेळ लागतो.(48 मेगापिक्सल कॅमेरा, 5 हजार बॅटरी क्षमतेसह जबरदस्त फिचर्स असलेला Redmi Note 10 पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध)

 Tweet:

Boat Airdopes 621 ईअरबड्सची किंमत 2999 रुपये आहे. हे ईअरफोन अॅक्टिव्ह ब्लॅक आणि व्हाइट फ्रॉस्ट रंगाच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध करुन दिले आहेत. कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून ते खरेदी करता येणार आहे.