चीन मधील कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) प्रमियम स्मार्टफोन कंपनी अॅपलचे मोठे नुकसान झाले आहे. TF इंटरनॅशनल सिक्युरिटी अॅनालिस्ट मिंग-ची कुओ 2020 पहिल्या तिमाहित अॅपलच्या शिपमेंट मध्ये 10 टक्क्यांनी घट झाल्याचे सांगण्यात आले आहे. कुओ यांनी पहिल्या तिमाहित ग्लोबल आयफोन शिपमेंट 36 ते 40 मिलियन झाल्याचे सांगितले असून गेल्या अनुमानानुसार 10 टक्के कमी आहे. कंपनीने कोरोना व्हायरमुळे त्यांचे कॉर्पोरेट ऑफिस, स्टोर आणि रिपेअर सेंटर सुद्धा बंद केले आहेत. रिपोर्ट मध्ये हे सुद्धा सांगण्यात आले आहे की, फक्त अॅपलच नाही तर अॅन्ड्रॉइड मॅन्युफॅक्चर सुद्धा प्रभावित होणार आहेत.
कंपनीचा सर्वात स्वस्त मोबाईल iPhone SE2 बाबत बोलायचे झाल्यास त्याची माहिती लीग झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर फोन संबंधित नवी माहिती समोर आली आहे. लीक झालेल्या फिचरच्या मते, SE2 चे डिझाइन आयफोन 8 सारखे असणार आहे. तसेच फोनमध्ये सिंगल रियर कॅमेरा देण्यात येण्याची शक्यता आहे.(एका स्क्रूमुळे अमेरिकेचे झाले कोट्यावधीचे नुकसान; Apple ने चीनला दिला नवा रोजगार)
2021 मध्ये अॅपल कंपनी पूर्णपणे वायरलेस आयफोन लॉन्च करणार आहे, अशी माहिती टेक अॅनालिस्ट मिंग-ची क्योने (Analyst Ming-Chi Kuo) आपल्या रिपोर्टमध्ये दिली आहे. आतापर्यंत अॅपलमध्ये चार्जिंग पोर्ट म्हणून अॅपलमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळत आले आहे. पंरतु, आता आता कंपनी संपूर्णपणे वायरलेस फोनच्या टेक्नॉलॉजीचा फोन लाँच करणार आहे.