जग डिजिटल झालं आहे. त्यामुळे अनेकजण मोकळ्या वेळात सोशल मीडिया हाताळताना दिसतात. इंटरनेटचा वापर वाढला असून आपला कितीतरी वेळ सोशल साईट्सवर ऑनलाईन राहण्यात जातो. टेक्नोलॉजीने आपले जीवन व्यापल्याने बरीचशी कामे आपण ऑनलाईनच करतो. पण दिवसभरातील किती वेळ आपण सोशल मीडियावर घालवतो, याचा अंदाज तुम्हाला आहे का? कदाचित नसेल. पण हा वेळ मोजण्यासाठी एक अॅप उपलब्ध आहे. या अॅपचे नाव आहे अॅक्शनडॅश (ActionDash). हे अॅप फक्त अॅनरॉईड युजर्ससाठी उपलब्ध आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही सोशल मीडियावर किती वेळ घालवला याची माहिती मिळते. पिक्सल आणि अॅनरॉईड वन केड डिजिटल वेलबीईंगच्या माध्यमातून आलेली माहिती या अॅपच्या माध्यमातून युजर्सला मिळते.
अॅक्शनडॅशमुळे युजर्सला दिवसभरात तुम्ही किती वेळ कुठे घालवलात ही माहिती मिनिटांत मिळते. म्हणजे डेली अॅक्टीव्हीटी मिनिटाभरात तुमच्या हाती येईल. या अॅपच्या मदतीने तुम्ही दिवसभरात स्मार्टफोन स्क्रीन, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, युट्युब आणि अशाप्रकारच्या वेगवेगळ्या अॅप्सवर किती वेळ खर्च केलात ते ट्रॅक करु शकता.
अॅक्शन डॅश अॅपची डेव्हलपर क्रिस लेसी (Chris Lacy) ने सांगितले की, "अॅक्शन डॅश अॅप सध्या गुगल प्ले वर उपलब्ध आहे. यात तुम्ही जाहीराती रिमूव्ह करुन डार्क मोड सारख्या दुसऱ्या सेवांचाही लाभ घेऊ शकता."