India vs Australia 2nd ODI 2019: मैदानाच्या मध्यभागी घुसून तरुणाने धोनीला दम लागेपर्यंत पळवले (Video)
धोनीला भेटण्यासाठी मैदानावर आला चाहता (Photo Credits: Twitter)

India vs Australia 2nd ODI 2019: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा दुसरा एकदिवसीय सामना चालू असताना, माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) चा एक व्हिडिओ या वेळी सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत असलेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी जेव्हा मैदानामध्ये फील्डिंग करण्यासाठी उतरतो, त्यावेळी त्याचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी मैदानावर येतो. धोनी हे पाहताच त्या चाह्त्यापासून वाचण्यासाठी मैदानावरच इकडे तिकडे धावताना दिसून येत आहे. शेवटी धोनी विकेटच्या मागे जाऊन उभा राहतो, आणि त्या चाहत्याची गळाभेट घेतो.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आजच्या सामन्यात माजी कर्णधार आणि विकेटकीपर फलंदाज महेंद्रसिंग धोनी, एकही रन न काढता बाद झाला. धोनी एडम जम्पाच्या बॉलवर स्लीपमध्ये उभा असलेल्या उस्मान ख्वाजाच्या हातून बाद झाला. वनडे फॉरमॅटमध्ये तब्बल आठ वर्षानंतर धोनी फलंदाजी करताना शून्यावर बाद झाला आहे. याआधी शेवटी 2010 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्याच वनडे सामन्यामध्ये एकही रन न करता तो बाद झाला होता. धोनी आपल्या संपूर्ण क्रिकेट करियरमध्ये एकूण पाच वेळा गोल्डन डकची शिकार बनलेला आहे. (हेही वाचा: असा कॅच तुम्ही कधीच पाहिला नसेल! स्ट्राइक बॅट्समनने टोलावलेला चेंडू नॉन स्ट्राइक बॅट्समनच्या बॅटला लागून खेळाडू आऊट)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील धोनीने नाबाद अर्धशतक पूर्ण केले होते. धोनीने या सामन्यात 72 चेंडूंचा सामना करत सहा चौकार आणि आणि एक षटकार यांच्या सहाय्याने 60 धावा केल्या होत्या. धोनीचीच्या या दमदार कामगिरीमुळे भारताने हा सामना 6 विकेटनी जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती.