Virat Kohli: आरआर विरुद्ध आरसीबी आयपीएल 2025 सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान विराट च्या चाहत्यांचा 'कोहली, कोहली' असा जयघोष (Watch Video)

विराट कोहलीने आयपीएल 2025 मध्ये 5 पाच सामन्यात 186 धावा केल्या आहेत. पहिल्या विजेत्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी कोहलीने दोन अर्धशतके केली आहेत.

Virat Kohli: आरआर विरुद्ध आरसीबी आयपीएल 2025 सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान विराट च्या चाहत्यांचा 'कोहली, कोहली' असा जयघोष (Watch Video)
Virat Kohli (Photo Credit X)

Virat Kohli: जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium) बहुप्रतिक्षित इंडियन प्रीमियर लीग 2025मध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. सामन्याआधी सराव सत्रातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये विराट कोहलीचे चाहते "कोहली, कोहली" असा त्याच्या नावाचा जयघोष करत आहेत. विराट बेंगळुरू संघाकडून आयपीएल मध्ये खेळत आहे. अनुभवाच्या जोरावर त्याने 5 पाच सामन्यांमध्ये 46.50 च्या उत्कृष्ट सरासरीने 186 धावा केल्या आहेत.

 

सवाई मानसिंग स्टेडियमवर विराट कोहलीचा जयघोष

(The above story first appeared on LatestLY on Apr 13, 2025 04:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).