रिषभ पंत (Photo Credit: Twitter/@StarSportsIndia)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) टी-20 लीगमध्ये सर्वात स्पर्धात्मक मानली जाते. आतापर्यंत या लीगमध्ये 8 संघ होते परंतु आयपीएल 2022 मध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद संघ यावर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करीत आहेत. तर मुंबई स्थित मुंबई इंडियन्स, आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ असून दोन विश्वचषक विजेता कर्णधार एमएस धोनीची चेन्नई सुपर किंग्ज दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनी पहिल्या सत्रापासून आजही पुढाकाराने CSK संघाचे नेतृत्व करत आहे. तर रोहित शर्माने 2013 च्या मध्यापासून मुंबई इंडियन्सची कमान हाती घेतली होती. पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्या आयपीएल फ्रँचायझीने आपला कर्णधार सर्वाधिक वेळा बदलला आहे.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा कर्णधार बदलल्याचा विक्रम दिल्ली आणि पंजाब फ्रँचायझीच्या नावे आहे. होय! तब्बल 13 खेळाडूंनी आतापर्यंत दोन्ही फ्रँचायझींचे नेतृत्व केले आहे. पंजाबचा पहिला कर्णधार धाडक अष्टपैलू युवराज सिंह होता तर माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग सर्वप्रथम दिल्लीचे नेतृत्व केले होते. याउलट मुंबईच्या सर्वात यशस्वी आयपीएल संघाने आतापर्यंत 4 पूर्णवेळ कर्णधार बदलले आहेत. मुंबईचा पहिला कर्णधार सचिन तेंडुलकर होता. त्यानंतर हरभजन सिंह, आणि रिकी पॉन्टिंग यांनी संघाची धुरा हाती घेतली. पाँटिंग एका हंगामाच्या मध्यातच कर्णधार पायउतार झाल्यावर रोहित शर्माला कर्णधार बनवण्यात आले आणि तेव्हापासून रोहित मुंबईचे यशस्वीरीत्या नेतृत्व करत आहे. (IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सने कोट्यवधी रुपये देऊन केले खरेदी, आता ‘हा’ धाकड किमान 4 ते 5 सामन्यातून होणार बाहेर; जाणून घ्या कारण)

फ्रँचायझीने कर्णधार बदलण्याचे किंवा खेळाडूंनी स्वतः पायउतार होण्याच्या निर्णयामागचे मुख्य कारण म्हणजे संघाचे प्रदर्शन आहे. आयपीएलमधील पंजाब संघाची आतापर्यंतची कामगिरी पहिली तर पंजाबने आतापर्यंत खेळलेल्या 176 पैकी 80 सामने जिंकले आहेत, तर 94 सामने गमावले आहेत. तर या उलट दिल्लीने 210 सामन्यांपैकी 93 जिंकले असून 111 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. पंजाबची सर्वोत्तम कामगिरी 2014 मध्ये आली जेव्हा ते महान ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत पोहोचले. त्यानंतर पंजाब संघाची कामगिरी सातत्याने घसरत चालली आहे. त्यामुळे पंजाब संघाने आपला कर्णधार वेळोवेळी बदलला. तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीने 2020 मध्ये पहिल्यांदा अंतिम सामना खेळला होता.

दिल्ली फ्रँचायझी कर्णधार: वीरेंद्र सेहवाग (2008-2012), गौतम गंभीर (2009, 2018), किनेश कार्तिक (2010-2014), जेम्स होप्स (2011-2011), महेला जयवर्धने (2012-2013), रॉस टेलर (2012-2012), डेव्हिड वॉर्नर (2013-2013) केविन पीटरसन (2014-2014) जेपी ड्युमिनी (2015-2016) झहर खान (2016-2017) करूण ), श्रेयस अय्यर (2018-2020), ऋषभ पंत.

पंजाब फ्रँचायझी कर्णधार: युवराज सिंह (2008-2009), कुमार संगकारा (2010), महेला जयवर्धने (2010), अॅडम गिलख्रिस्ट (2011-2013), डेविड हसी (2012-2013) जॉर्ज बेली (2014-2015), वीरेंद्र सेहवाग (2015), मिलर (2016), मुरली विजय (2016), ग्लेन मॅक्सवेल (2017), आर अश्विन (2018-2019), केएल राहुल (2020-2021) मयंक अग्रवाल (2021).