RR

Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Indian Premier League 2025: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) मध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants vs Rajasthan Royals) यांच्यात जोरदार टक्कर होणार आहे. हा सामना लीग टप्प्यातील 36 वा सामना असेल आणि दोन्ही संघांमधील हा आठवा सामना असेल. जे जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळवले जाईल. लखनौ सुपर जायंट्सने आतापर्यंत सातपैकी चार सामने जिंकले आहेत. तर राजस्थान रॉयल्सची परिस्थिती चिंताजनक आहे. त्यांनी सातपैकी फक्त दोन सामने जिंकता आले आहेत.

राजस्थान रॉयल्सने सलग तीन सामन्यात पराभव पाहिला आहे. तर गेल्या काही सामन्यांमध्ये एलएसजीची कामगिरी चांगली राहिली आहे. सलग तीन सामने जिंकल्यानंतर, लखनौचा शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध हरवला होता. या हंगामात हे दोन्ही संघ यापूर्वी एकदा आमनेसामने आले आहेत. जिथे सामना शेवटच्या षटकापर्यंत चालला आणि लखनौने सहा विकेट्सने विजय मिळवला.

या खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा:

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आयपीएल 2025मधील प्रमुख खेळाडू या सामन्यात निकाल बदलण्याची ताकद ठेवतात. निकोलस पूरन, यशस्वी जयस्वाल, रवी बिश्नोई, रियान पराग, शार्दुल ठाकूर, जोफ्रा आर्चर यांसारख्या खेळाडूंमध्ये सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता आहे. या खेळाडूंच्या कामगिरीवर दोन्ही संघांचे भवितव्य अवलंबून असेल.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आयपीएल हेड-टू-हेड रेकॉर्ड:

आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात एकूण 6 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये राजस्थानने चार सामने जिंकले आहेत. तर लखनौने फक्त दोन सामने जिंकले आहेत. या दृष्टिकोनातून, रेकॉर्ड राजस्थानच्या बाजूने थोडासा असल्याचे दिसते.