
Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders Head-To-Head Record: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs RCB) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 चा 58 वा सामना बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावामुळे 10 मे पासून ही स्पर्धा एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आरसीबीला विजयाची नितांत आवश्यकता असली तरी, केकेआरसाठी हा सामना करा किंवा मरो असा असेल. पराभव झाल्यास कोलकाता संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. जर पावसामुळे सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल.
मात्र, सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता असल्याने दोन्ही संघांच्या चिंता वाढल्या आहेत. AccuWeather च्या अहवालानुसार, संध्याकाळी पावसाची शक्यता 34 टक्के आहे. जी रात्री 9 पर्यंत 40 टक्के आणि रात्री 10 पर्यंत 51 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. रात्री 11 वाजेपर्यंत पावसाची शक्यता थोडी कमी होऊन 47 टक्के होईल. अशा परिस्थितीत, हा सामना पावसामुळे प्रभावित होऊ शकतो. मात्र, एम. चिन्नास्वामी स्टेडियममधील ड्रेनेज सुविधा देशातील सर्वोत्तम मानली जाते आणि पाऊस थांबल्यानंतर काही मिनिटांत सामना पुन्हा सुरू करता येतो.
केकेआर विरुद्ध आरसीबी हेड-टू-हेड रेकॉर्ड: आयपीएल 2008 पासून कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात एकूण 35 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये केकेआरने 20 सामने जिंकले आहेत. तर आरसीबीने 15 वेळा विजय मिळवला आहे.