RCB vs CSK IPL 2021 Predicted Playing XI: आकडे देतात धोनीची साथ, विराटला करावा लागणार पलटवार; पाहा चेन्नई व बेंगलोरचा संभावित प्लेइंग इलेव्हन
विराट कोहली-एमएस धोनी (Photo Credit: Twitter)

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध मैदानात उतरेल तेव्हा ते विजयी ट्रॅकवर परत येण्याचा प्रयत्न करतील. गेल्या सामन्यात नऊ विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले होते. बेंगलोरने आतापर्यंत खेळलेल्या आठ पैकी पाच सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित सहापैकी किमान तीन सामने जिंकणे गरजेचे आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज खूप मजबूत दिसत आहे. बेंगलोर आणि चेन्नई आजवर एकूण 27 वेळा एकमेकांशी भिडले आहेत. यादरम्यान आरसीबीला (RCB) फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. चेन्नईने आतापर्यंत 27 पैकी 17 सामने जिंकले आहेत. याशिवाय गेल्या सामन्यात देखील सीएसकेने (CSK) बाजी मारली होती त्यामुळे विराट ब्रिगेड पलटवार करण्यासाठी उत्सुक असेल. ()

शारजाह क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. एकीकडे ‘विराटसेने’पुढे धोनीच्या ‘येलो आर्मी’चा विजयरथ रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांना गेल्या सामन्यात संघर्ष करावा लागला होता. ज्याचा फायदा आरसीबीचे धुरंधर गोलंदाज करून घेण्याच्या प्रयत्नात असतील. रुतुराज गायकवाडला वगळता अन्य फलंदाज प्रभाव पाडू शकले नव्हते. मात्र गोलंदाजांनी मुंबई फलंदाजांवर हल्ला चढवत संघाला विजय मिळवून दिला. दुसरीकडे, बेंगलोरचा संपूर्ण संघ मागील सामन्यात कोलकातापुढे हतबल दिसला. त्यामुळे चेन्नईविरुद्ध खेळाडू आक्रमक खेळीसाठी प्रयत्नशील असतील. मात्र, या सामन्यासाठी दोन्ही संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करताना दिसत नाही. दोन्ही संघातील हेड-टू-हेड आकडेवारी धोनीचा साथ देत असली तरी विराट ब्रिगेड आपला मागील पराभव मागे टाकून कमबॅक करण्याच्या निर्धारित असेल. अशा स्थितीत हा सामना काट्याचा होणार असे दिसत आहे.

चेन्नई विरुद्ध बेंगलोर सामन्याचा संभाव्य प्लेइंग XI

चेन्नई सुपर किंग्स संभावित प्लेइंग XI: एमएस धोनी (कॅप्टन), फाफ डु प्लेसिस, रुतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, सॅम कुरान, ड्वेन ब्रावो, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा

आरसीबी संभावित प्लेइंग XI: विराट कोहली (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, केएस भरत (विकेटकीपर), एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज आणि काईल जेमीसन.