RCB Unbox Event: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 चा हंगाम सुरू होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा वार्षिक अनबॉक्स कार्यक्रम देखील चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आहे. 22 मार्च रोजी होणाऱ्या आयपीएल 2025 च्या उद्घाटन सामन्यापूर्वी, आरसीबी अनबॉक्स कार्यक्रम फ्रँचायझीच्या चाहत्यांना त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंना भेटण्याची संधी देत आहे.
आरसीबी अनबॉक्स इव्हेंट 2025 मध्ये काय खास असेल?
आरसीबी अनबॉक्स इव्हेंट 2025 दरम्यान फ्रँचायझी पहिल्यांदाच त्यांच्या नवीन आयपीएल 2025 जर्सीचे अनावरण करेल. याशिवाय, संघातील सर्व खेळाडूंची ओळख करून दिली जाईल आणि नवीन आरसीबी हॉल ऑफ फेम सदस्यांचीही घोषणा केली जाईल.
इव्हेंट कधी आणि कुठे होईल?
आरसीबी अनबॉक्स इव्हेंट 2025 उद्या होणार आहे आणि तो फ्रँचायझीच्या होम ग्राउंड, एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. हा कार्यक्रम दुपारी 4 वाजता सुरू होईल.
आरसीबी अनबॉक्स इव्हेंट 2025 साठी तिकिटे कशी बुक करावी?
चाहते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अॅप आणि वेबसाइटवरून आरसीबी अनबॉक्स इव्हेंट 2025 चे ऑनलाइन तिकिटे बुक करू शकतात. तिकिटाची किंमत 800 ते 4000 रुपयांपर्यंत असेल.
इव्हेंट मध्ये कोणते सेलिब्रिटी परफॉर्म करतील?
आरसीबी अनबॉक्स इव्हेंट 2025 मध्ये भारतीय स्टार कलाकार हनुमानकिंद हे मुख्य आकर्षण असतील. शिवाय, डीजे टिमी ट्रम्पेट आणि संजीत हेगडे देखील या कार्यक्रमात दमदार परफॉर्मन्स देतील.
इव्हेंट चे लाईव्ह टेलिकास्ट कुठे पहायचे?
दुर्दैवाने, आरसीबी अनबॉक्स इव्हेंट 2025 चे थेट प्रक्षेपण कोणत्याही टीव्ही चॅनेलवर उपलब्ध होणार नाही.
आरसीबी अनबॉक्स इव्हेंट 2025 चे मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पहायचे?
चाहते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या अधिकृत वेबसाइट आणि अॅपवर आरसीबी अनबॉक्स इव्हेंट 2025 साठी लाईव्ह स्ट्रीमिंग पर्यायांचा लाभ घेऊ शकतात.