
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC Final 2023) च्या अंतिम सामन्यात आतापर्यंत तीन दिवस खेळले गेले आहेत. आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. दुसऱ्या डावात पाच विकेट गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 320 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) एक मोठा विक्रम केला. (हे देखील वाचा: WTC Final Viral Video: शाब्बास, खेळत रहा! रहाणे- शार्दुलची ओव्हलच्या मैदानावर 'मराठी'तून रणनिती, व्हिडिओ होत आहे व्हायरल)
असा पराक्रम करणारा जडेजा ठरला पहिला भारतीय
स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडला बाद केल्यानंतर रवींद्र जडेजाने मोठा विक्रम केला. तो आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा डावखुरा भारतीय फिरकी गोलंदाज बनला आहे. या प्रकरणात त्याने 67 सामन्यात 266 विकेट्स घेणारा भारतीय अनुभवी बिशनसिंग बेदीचा विक्रम मोडला. त्याचबरोबर रवींद्र जडेजाने 65 सामन्यांत 267 विकेट्स घेतल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा डावखुरे फिरकी गोलंदाज
- 433 रंगना हेरथ
- 362 डॅनियल व्हिटोरी
- 297 डेरेक अंडरवुड
- 267 रवींद्र जडेजा
- 266 बिशनसिंग बेदी
पहिल्या डावात फलंदाजीनी अप्रतिम कामगिरी
रवींद्र जडेजाने आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC फायनल 2023) च्या अंतिम सामन्यात चेंडू तसेच बॅटने चमत्कार केले आहेत. रवींद्र जडेजाने पहिल्या डावात 51 चेंडूत 48 धावांची खेळी केली आणि 1 बळी घेतला. त्याचबरोबर दुसऱ्या डावातही तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.