IND vs SA T20 WC 2024 Final: टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना (T20 World Cup 2024 Final) शनिवारी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ (IND vs SA) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषकावर कब्जा केला आहे. टीम इंडियाने या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आणि संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिली. भारतीय संघांच्या शानदार विजयानंतर टीम इंडिया मालामाल होणार आहे. नुकताच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टी-20 विश्वचषक जिंकल्याबद्दल टीम इंडियाला 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ते म्हणाले, "आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024 जिंकल्याबद्दल टीम इंडियासाठी INR 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करताना मला आनंद होत आहे. संपूर्ण स्पर्धेत संघाने अपवादात्मक प्रतिभा, दृढनिश्चय आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन केले आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन!"

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)