PC-X

IPL 2025: कोलकाता नाईट रायडर्सचा सह-मालक आणि जागतिक सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) आयपीएल 2025 (IPL) च्या उद्घाटनासाठी कोलकाता येथे दाखल झाला आहे. केकेआर संघाला पाठिंबा देण्यासाठी शाहरुख आला आहे. कोलकातामध्ये (KKR) दाखल होण्याआधी त्याने चाहत्यांना भेट देत खूश केले. काल झालेल्या उद्घाटन समारंभासाठी श्रेया घोषाल, दिशा पटानी आणि करण औजला या तीन कलाकारांनी कलेचे सादरीकरण केले.

2008 मध्ये झालेल्या पहिल्या आयपीएलनंतर केकेआर आणि आरसीबी पहिल्या सामन्यात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असेल. हा सामना एमए चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये ब्रेंडन मॅक्युलमने सर्व अडचणींना झुगारून 158 धावा केल्या. केकेआर विरोधात आरसीबीने विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल यांच्या रूपात एक कोअर टीम तयार केली आणि फिल साल्ट, भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पंड्या सारख्या उत्तम क्रिकेटपटूंचा संघात समावेश केला आहे.