मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

IPL 2022 Playoffs Prediction: आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सलग सहाव्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे आता MI साठी आयपीएल प्लेऑफमध्ये (IPL Playoffs) पात्र ठरणे खूपच आव्हानात्मक बनले आहे. याशिवाय प्लेऑफसाठी अन्य संघांमध्येही चुरशीची स्पर्धा रंगली आहे. अधिकतर सर्व संघांनी 6 सामने खेळले आहेत, ज्यांनंतर प्लेऑफचे चित्र थोडेफार स्पष्ट होऊ लागले आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामात, गुजरात आणि लखनौ, दोन नवीन संघ सामील झाले असून दोंघांनी प्रभावी कामगिरी केली आहे. दुसरीकडे, मुंबईचे साखळी सामन्यांमध्ये संघाचे 8 सामने बाकी आहेत. अशा स्थितीत मुंबईचा संघ या सामन्यांमध्ये पुनरागमन करून प्लेऑफसाठी पात्र ठरू शकेल का, हा मोठा प्रश्न आहे. (IPL 2022: आयपीएलमध्ये सलग सहा सामन्यांमध्ये पराभवाची नामुष्की, मुंबई इंडियन्स आणि आणखी दोन संघांच्या नावे ही कामगिरी)

आयपीएलच्या प्लेऑफ बाबत बाकीच्या वर्तवले तर यावेळी अंतिम चार संघात गुजरात (Gujarat Titans) आणि लखनौ (Lucknow Super Giants) प्रवेश मिळवण्यासाठी मजबूत दावेदार आहेत. हार्दिक पांड्याच्या गुजरातने 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत तर केएल राहुलच्या लखनौने सहा सामन्यातील चारमध्ये विजयाचा नारळ फोडला आहे. याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पंजाब किंग्स (Punjab Kings), कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद सध्या प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचे अंतिम-4 मध्ये पोहोचण्याची शक्यता कमी दिसत आहे. दिल्लीने 5 पैकी अजून दोन तर चेन्नईने तितक्याच खेळलेल्या सामन्यात एकच विजय मिळवला आहे. त्यामुळे या दोघांना प्लेऑफ खेळाचे असल्यास त्यांच्या स्वतःच्या कामगिरी शिवाय अन्य संघांवरही त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. याशिवाय पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबईला प्लेऑफ खेळायचे असल्यास आता शिल्लक 8 मधील सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकणे गरजेचे आहे.

MI सा सामने गमावल्यानंतर गुणतालिकेत तळाशी बसलेला आहे. त्यामुळे आता आठ सामने जिंकून त्याला 16 गुण मिळतील, मात्र असे असूनही त्यांना कोणत्याही संघाकडून रनरेटचे आव्हान मिळू शकते. अशा परिस्थतीत प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी मुंबईला चांगल्या रनरेटसह टॉप 4 मध्ये प्रवेश करणे आवश्यक आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सलामीच्या सामन्याने मुंबईच्या पराभवाची मालिका सुरु झाली. लक्षणीय आहे की मुंबईने विजयाच्या जवळ येऊन अधिक सामने गमावले आहेत. तर त्यांचे अनुभवी खेळाडू आपल्या जुन्या लयीत दिसत नाही आहे, त्यामुळे त्यांच्यावर सलग सहा सामने गमावण्याची नामुष्की ओढवली आहे.