IPL 2022 Mega Auction Live Streaming: आयपीएल खेळाडूंच्या मेगा लिलावाचे लाइव्ह ब्रॉडकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे व कसे पाहणार?
आयपीएल (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022 Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 2022 मेगा लिलावाचे (IPL Mega Auction) काउंटडाउन सुरु झाले आहे ज्यामध्ये शेकडो देशी आणि परदेशी खेळाडूंच्या भवितव्य ठरवले जाईल. यावेळी 8 नव्हे तर 10 फ्रँचायझी आयपीएल मेगा लिलावात सहभागी होत आहेत, त्यामुळे सर्व फ्रँचायझींना त्यांच्या ताफ्यात खेळाडूंचा समावेश करण्यासाठी कडवी झुंज मिळणार आहे. यावेळी देखील लिलाव ब्रिटनचे ह्यू अॅडम्स करणार आहेत. आयपीएल लिलावात (IPL Auction) अॅडम्सचे नेतृत्व करण्याची ही चौथी वेळ असेल. लक्षात घ्यायचे की एकूण 900 कोटी रुपयांच्या लिलावाच्या बजेटपैकी फ्रँचायझीने आधीच क्रिकेटपटूंना कायम ठेवण्यासाठी 384.5 कोटी रुपये खर्च केले आहेत. म्हणजेच लिलावादरम्यान दहा फ्रँचायझींना उर्वरित 515.5 कोटी रुपये त्यांच्या आवडीचे खेळाडू खरेदी करण्यासाठी वापरायचे आहेत. (IPL 2022 Mega Auction: देश-विदेशातील 590 खेळाडू लिलावाच्या रिंगणात, पण कोणत्या फ्रँचायझीकडे किती जागा बाकी? किती आहे त्यांचे बजेट?)

आयपीएलच्या (IPL) 15 व्या हंगामाच्या मेगा लिलावाचे लाइव्ह ब्रॉडकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे, कसे आणि कधी पाहाता येतील याची सर्व माहिती पुढीलप्रमाणे आहे. आयपीएल 2022 मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या लिलावाची सुरुवात शनिवारी सकाळी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. अधिकृत ब्रॉडकास्टरवर लाईव्ह कव्हरेज दोन्ही दिवशी सकाळी 11 वाजता सुरू होईल. इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या मेगा लिलावाचे लाइव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तर लाइव्ह स्ट्रीमिंग Disney+ Hotstar वर देखील पाहिले जाऊ शकते. इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामाच्या लिलावासाठी नोंदणी केलेल्या 1214 खेळाडूंपैकी 590 खेळाडू लिलावाच्या रिंगणात उतरणार आहेत.

पंजाब किंग्स (PBKS) मेगा लिलावात सर्वाधिक बजेटसह उतरणार आहे. लीगच्या 15 व्या आवृत्तीपूर्वी फक्त दोन खेळाडूंना कायम ठेवल्याने, PBKS कडे लिलावासाठी 72 कोटी रुपये शिल्लक आहेत. यावेळी लिलावात एकूण 229 कॅप्ड, 354 अनकॅप्ड खेळाडू असतील आणि असोसिएट संघातील 7 खेळाडूंवर बोली लावली जाईल. लिलावापूर्वी फ्रँचायझींनी एकूण 30 खेळाडूंना थेट रिटेन्शन किंवा ड्राफ्ट निवडीद्वारे कायम ठेवले आहे. तर 8 विद्यमान फ्रँचायझींना प्रत्येकी जास्तीत जास्त 4 खेळाडू ठेवण्याची परवानगी असताना, 2 नवीन फ्रँचायझींना (लखनौ आणि अहमदाबाद) मेगा लिलाव सुरू होण्यापूर्वी प्रत्येकी 3 नवीन खेळाडूंची निवड करण्याची संधी देण्यात आली होती.