IPL 2021: मुंबई इंडियन्ससाठी गुड न्यूज, ‘या’ घातक फलंदाजाने सुरु केला सराव; KKR विरोधात पुनरागमन होण्याची शक्यता
क्विंटन डी कॉक (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2021: आयपीएल (IPL)गतविजेत्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये अपेक्षेनुसार सुरुवात झाली नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरोधात झालेल्या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात संघाला 2 विकेटने पराभव पत्करावा लागला. आयपीएल 2020 फायनल सामन्यातून संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक मोठा बदल करण्यात आला. संघाचा घातक सलामी फलंदाज क्विंटन डी कॉकला (Quinton de Kock) क्वारंटाईन कालावधीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर पडावे लागले होते. मुंबई संघाचा आता पुढील सामना आता मंगळवार, 13 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सशी (Kolkata Knight Riders) होणार असून यापूर्वीच संघासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. डी कॉकने आता आपला सात दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण केला असून त्याने मैदानात सरावाला सुरुवात केली आहे. मुंबईस्थित फ्रँचायझीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर डी कॉकच्या सरावाचा व्हिडिओ शेअर करून याची पुष्टी केली. (IPL 2021: ‘पहिला सामना अखेरचा असू शकतो’, RCB विरुद्ध रोहित शर्माला रनआऊट करणाऱ्या Chris Lynn ने दिली मोठी प्रतिक्रिया)

दरम्यान, डी कॉकच्या पुनरागमनाने क्रिस लिनला दुसऱ्या सामन्यात संघाबाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. आरसीबी संघाविरुद्ध आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करत ऑस्ट्रेलियन फलंदाजाने 35 चेंडूत 49 धावा केल्या होत्या. लिनने दोन्ही संघाकडून खेळाडूने सामन्यात केलेल्या सर्वाधिक धावांची नोंद केली होती. लिनला मागील वर्षी मुंबईने लिलावात खरेदी केले होते मात्र त्याला डी कॉकच्या उपस्थितीमुळे खेळण्याची संधी मिळाली नव्हती. अखेर डी कॉक यंदा राष्ट्रीय संघासाठी खेळत असल्यामुळे आणि त्यानंतर क्वारंटाईन कालावधीमुळे खेळण्यात अपयशी ठरल्यावर लिनला कर्णधार रोहित शर्मासह सलामीला येण्याची संधी मिळाली. मुंबई आणि कोलकाता संघातील आयपीएल सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. अशास्थितीत डी कॉक संघात परातल्यास लिनला त्याच्यासाठी जागा रिकामी करावी लागेल. मागील वर्षी डी कॉकने मुंबईसाठी अनेक महत्वपूर्ण खेळी करत संघाच्या विजयात महत्वाचा वाट उचलला होता.

दुरीकडे, मुंबई इंडियन्सची आयपीएल 14 सीजनची सुरुवात पराभवाने झाली असली तरी संघ आपले सहावे आणि सलग तिसरे विजेतेपद जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये कोणत्याही संघाला होम ग्राउंडचा फायदा होणार नसल्याने मुंबई संघाला एकही सामना वानखेडे स्टेडियमवर खेळता येणार असल्याने संघाच्या कामगिरीवर चाहत्यांचे लासखा लागून असणार आहेत.