IPL 2021 Live Streaming Online in Marathi Commentary: मराठी भाषेत इंडियन प्रीमियर लीग 14 चे विनामूल्य टेलीकास्ट पहा Disney+ Hotstar वर
IPL 2021 (Photo Credits: ANI)

IPL 2021 Live Streaming Online in Marathi Commentary: इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) प्रसारक स्टार आणि Disney इंडियाने आजपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेच्या 14व्या मोसमातील कॉमेंटरीसाठी 100 भाष्य करणाऱ्यांची टीम घोषित केली आहे. Disney+ Hotstar ऑनलाईनवर यंदा इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि नव्याने समाविष्ट केलेल्या मराठी भाषेत कॉमेंटरी केली जाईल. यासाठी स्टारने तब्बल 100 तज्ञ भाष्यकारांची टीम घोषित केली ज्यामध्ये जगभरातील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश आहे. आयपीएलच्या (IPL) 14व्या हंगामाला पुढील काही तासात सुरुवात होणार आहे. करोना व्हायरसमुळे सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय रिक्त स्टेडियममध्ये होणार आहे ज्यामुळे प्रेक्षकांना यंदाही सामने घर बसल्या टीव्हीवर लाईव्ह पाहावे मिळणार आहे. अशास्थितीत डिस्नी इंडियाने भारतातील आयपीएल चाहत्यांचा विचार करत तब्बल 8 भारतीय भाषांमध्ये आयपीएल कॉमेंटरी करण्याचा निर्णय घेतला आहे. (How to Download Hotstar & Watch MI vs RCB IPL 2021 Match 1: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल मॅच पाहण्यासाठी हॉटस्टार कसं डाउनलोड कराल?)

विनोद कांबळी, संदीप पाटील, अमोल मुजुमदार, स्नेहल प्रधान, कुणाल दाते, प्रसन्ना संत आणि चैतन्य संत यांच्या आवाजात चाहत्यांना मराठी आयपीएल कॉमेंटरीचा आनंद घेता येणार आहे. भारतभरातील चाहते थेट स्टार स्पोर्ट्स चॅनेल्सवर आयपीएल 2021 सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकतात. स्टार स्पोर्ट्स हा इंडियन प्रीमियर लीग 14 चे अधिकृत प्रसारक आहे आणि चाहत्यांसाठी सर्व सामने लाईव्ह प्रसारित करतील. शिवाय, Disney+ Hotstar वर मराठी भाषेत चाहते आयपीएलचा आनंद घेऊ शकतात. टेलिव्हिजन सेटवर लाईव्ह सामने पाहण्यात अक्षम असणारे चाहते सर्व सामने ऑनलाईन सामन्याचे लाईव्ह स्ट्रीम पाहू शकतात. स्टार नेटवर्कचे ऑनलाइन मीडिया प्लॅटफॉर्म, डिस्नी+ हॉटस्टार भारतातील चाहत्यांसाठी ऑनलाईन सामने लाईव्ह प्रसारित करेल.

दरम्यान, कोविड-19 प्रकरणांच्या वाढती संख्येमुळे सामने रिकाम्या स्टेडियमवर आयोजित केले जातील. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील पहिला आयपीएल सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल.