IPL 2021: राजस्थान रॉयल्समध्ये Ben Stokes याची जागा घेण्यासाठी ‘हे’ 3 परदेशी खेळाडू आहेत दावेदार
बेन स्टोक्स (Photo Credit: Instagram)

Ben Stokes Replacement for IPL 2021: 2008 मध्ये अखेरच्या विजेतेपदानंतर राजस्थान रॉयल्सना (Rajasthan Royals) आयपीएल (IPL) चॅम्पियनशिपसाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यांनी प्रत्येक पर्याय वापरले आहेत आणि आता त्यांनी स्टार फलंदाज संजू सॅमसनला कर्णधारपदाची संधी दिली आहे. पंजाब किंग्ज विरुद्धच्या पहिल्या सामन्यादरम्यान रॉयल्सपुढे मोठ्या लक्ष्याचे आव्हान होते. खराब सुरुवात झाल्यानंतर सॅमसनने पुढाकार घेत शानदार शतक ठोकले. त्यांचा पराभव झाला असला तरी रॉयल्सपुढे एक मोठी समस्या उद्भवली आहे. त्यांचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने (Ben Stokes) यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मधून दुखापतीमुळे माघार घेतली आहे. बेन स्टोक्स सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे यात काही शंका नाही. आणि रॉयल्स संघात त्याची जागा भरून काढणे कोणत्याही खेळाडूसाठी कठीण होईल. नवीन कर्णधार सॅमसनसाठी स्टोक्ससारख्या अष्टपैलूची उपस्थिती एक मोठी बाब आहे पण आता, रॉयल्ससाठी त्याचा पर्याय शोधण्याची वेळ आली आहे. अशास्थितीत राजस्थान रॉयल्समध्ये आयपीएल 2021 साठी सामील होऊ शकणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. (Ben Stokes Ruled Out of IPL 2021: राजस्थान रॉयलच्या संघाला मोठा धक्का! ऑलराऊंडर बेन स्टोक्स आयपीएलमधून बाहेर)

1. लियाम लिव्हिंगस्टोन

राजस्थान रॉयल्सने लियाम लिव्हिंगस्टोन आयपीएल 2021 लिलावात 75 लाख रुपयात खरेदी केले होते. इंग्लिश क्रिकेटपटू आयपीएल 2020 खेळला नव्हता परंतु राजस्थान रॉयल्ससाठी त्याने आयपीएल 2019 खेळला आणि 4 सामन्यात 71 धावा केल्या.तथापि, एका सामन्यात त्याने सुंदर फलंदाजी केली आणि 44 धावा केल्या. राजस्थान रॉयल्समध्ये बेन स्टोक्सची जागा घेणारा तो दुसरा खेळाडू असून बेन स्टोक्ससारखा अष्टपैलू खेळाडूही आहे.

2. डेविड मिलर

मिलर हा राजस्थान रॉयल्ससाठी बेन स्टोक्सची जागा घेण्यासाठी उत्तम पर्याय आहे. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू डेविड मिलर एक शक्तिशाली हिटर आणि बेन स्टोक्स सारखा डाव्या हाताचा फलंदाज आहे. तो गोलंदाजी करू शकत नसला तरी स्टोक्सप्रमाणे आक्रमक फलंदाजी करू शकतो. मिलरने आतापर्यंत 80 आयपीएल सामन्यात 1850 धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये शतक आणि 9 अर्धशतके ठोकली आहेत ज्याच्यावरून हे सिद्ध होते की तो राजस्थान रॉयल्ससाठी महान फलंदाज ठरू शकतो.

3. अँड्र्यू टाय

राजस्थान रॉयल्स संघात बेन स्टोक्स हा परदेशी खेळाडू असल्याने संघ त्याच्या जागी इंग्लिश क्रिकेटपटू अँड्र्यू टायचा समावेश करु शकतो. टाय हा वेगवान गोलंदाज आहे आणि राजस्थान रॉयल्सने त्याला संधी दिल्यास त्यांचा गोलंदाजी विभाग अधिक घातक ठरू शकतो. पंजाब किंग्जविरुद्ध पहिल्या सामन्यात स्टोक्सने एकही धाव केली नाही तरीही संघाने 200+ धावांची उच्च धावसंख्या गाठली. अशास्थितीत राजस्थान रॉयल्स त्याच्या अनुपस्थितीत असूनही फलंदाजी करू शकते हे यावरून सिद्ध होते. त्यामुळे टाय स्टोक्सच्या जागी पूर्ण-वेळ गोलंदाजी करू शकतो.

लक्षात घेण्यासारखे म्हणजे राजस्थान रॉयल्सकडून यंदाच्या आयपीएलला मुकणार स्टोक्स दुसरा मोठा विदेशी खेळाडू आहे. यापूर्वी स्टोक्सचा इंग्लिश सहकारी जोफ्रा आर्चरने देखील दुखापतीमुळे स्पर्धेतून माघारी घेतली होती. अशास्थितीत आर्चर आणि स्टोक्सची अनुपस्थितीचा रॉयल्स संघावर कसा परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.