
IPL 2021: भारतात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोविड-19 प्रकरणांमुळे सध्या खेळाडूंमध्ये विशेषतः विदेशी खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण आहे. लियम लिविंगस्टोन, अँड्र्यू टाय, केन रिचर्डसन, अॅडम झांपा, रविचंद्रन अश्विन यांच्यासह खेळाडू आणि पंचांनी आयपीएलच्या (IPL) मैदानातून माघार घेतली आहे. शिवाय, आता आघाडीचे ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर (David Warner) देखील स्पर्धेतून लवकर बाहेर पडण्याच्या विचारात आहेत. स्मिथ यंदा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे तर वॉर्नर सनरायझर्स हैदराबादचे (Sunrisers Hyderabad) नेतृत्व करत आहे. त्यामुळे जर हे दोन्ही खेळाडू यंदा आयपीएलमधून बाहेर पडल्यास संघांवर त्यांचा बदली खेळाडू शोधण्याची नामुष्की ओढवेल विशेषतः हैदराबादवर कारण वॉर्नर त्यांचा मुख्य फलंदाजच नव्हे तर योग्य कर्णधार देखील आहे. अशास्थितीत वॉर्नरच्या जागी सनरायझर्सकडे कर्णधारपदाची असलेले खेळाडू:- (IPL 2021: कोरोनाचे संकट! डेव्हिड वार्नर, स्टिव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू आयपीएलमधून माघार घेण्याची शक्यता)
1. केन विल्यमसन (Kane Williamson)
विल्यमसनला वॉर्नरच्या कर्णधार बनवणे हे हैदराबाद संघासाठी मोठे उपयुक्त ठरू शकते. 2018 मध्ये वॉर्नरवर बंदी आल्यानंतर आयपीएलमध्येविल्यमसनने हैदराबादचे नेतृत्व केले होते आणि संघाला दुसऱ्या आयपीएल फायनलमध्ये प्रवेश करून दिला होता. विल्यमसन हा सनरायझर्स हैदराबाद संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य आहे. अशा परिस्थितीत वॉर्नर आयपीएल सोडून मायदेशी गेला तर टीम व्यवस्थापन त्याच्या जागी विल्यमसनला नेतृत्वाची जबाबदारी देऊ शकते.
2. जेसन होल्डर (Jason Holder)
या यादीत वेस्ट इंडिजचा कर्णधार होल्डर हे दुसरे मोठे नाव आहे. या यादीत वेस्ट इंडिजचा कर्णधार होल्डर हे दुसरे मोठे नाव आहे. होल्डर संघात नियमित सदस्य नसला तरी संधी मिळण्यास तो उपयुक्त सिद्ध झाला आहे. त्याला महत्त्वाच्या प्रसंगी संघातील अन्य खेळाडूंसोबत रणनीती बनवतानाही पहिले गेले आहे. अशा परिस्थितीत वॉर्नर मायदेशी परतल्यास होल्डरला हैदराबादच्या नेतृत्वाची कमान मिळू शकेल.
3. राशिद खान (Rashid Khan)
अफगाणिस्तानचा युवा कर्णधार राशिद सनरायझर्सच्या कर्णधार पदासाठीचा आणखी एक मुख्य दावेदार असू शकतो. खान सनरायझर्स हैदराबाद संघातील महत्त्वपूर्ण सदस्य आहे. त्याने आपल्या छोट्या क्रिकेट कारकिर्दीत लोकांवर खूप प्रभाव पाडला आहे.
राशिद खानने आजवरच्या आपल्या आयपीएल कारकिर्दीत 68 सामन्यात 20.1 च्या सरासरीने 84 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 28 डावात 8.2 च्या सरासरीने 156 धावा केल्या आहेत.