IPL 2020 Update: जोस बटलर पुनरागमनाच्या प्रतीक्षेत, इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी आशावादी (Watch Video)
जोस बटलर (Photo Credit: Getty)

तीन महिन्यांच्या प्रदीर्घ अंतरानंतर इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतण्याच्या मार्गावर आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज टीममध्ये 8 जुलै पासून 3 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. प्रत्येक क्रिकेटपटूप्रमाणे विकेटकिपर-फलंदाज जोस बटलर देखील पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय आणि घरगुती क्रिकेट स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीगही (आयपीएल) अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. नुकतंच एका मुलाखतीत राजस्थान रॉयल्सचा खेळाडू बटलरने त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची आठवण येत असल्याचे म्हटले. कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे जगातील अधिकांश देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने क्रिकेटसह अन्य क्रीडा स्पर्धाही रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या. मार्च 29 पासून आयपीएलची सुरुवात होणार होती, मात्र 15 एप्रिल पर्यंत स्पर्धा पुढे ढकलण्यात आली पण लॉकडाऊन अधिक वाढल्याने आयपीएलचा 13 वा हंगाम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला. (आयपीएल 2020 रद्द होण्याची शक्यता, PCB चा सप्टेंबर-ऑक्टोबर विंडो दरम्यान कोलंबोमध्ये आशिया चषक आयोजित करण्याचा प्रयत्न)

इतर चाहत्यांप्रमाणे बटलरला देखील आयपीएलमध्ये खेळणे मिस करत आहे. इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. राजस्थान रॉयल्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून बटलरचा एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तो कोरोनामुळे दीर्घकाळापासून ठप्प झालेल्या क्रिकेटबद्दल बोलत आहेत.पाहा हा व्हिडिओ:

दरम्यान, आयपीएलच्या नवीन वेळापत्रकाबद्दल बोलायचे तर बीसीसीआय प्रसिद्ध टी-20 लीगच्या 13 व्या सीजनसाठी सप्टेंबर-ऑक्टोबरच्या विंडोचा विचार करीत आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही संबंधित राज्य मंडळांना आयपीएलच्या आगामी हंगामाची तयारी सुरू करण्यास सांगितले आहे. दुसरीकडे, यंदाच्या आशिया चषकचेही आयोजन होणार आहे. आशिया चषकसाठीबीसीसीआय आयपीएलच्या काही सामने कमी करू शकते असेही वृत्त समोर येत आहे मात्र बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने या अफवांचे खंडन केले आहे.