
मेलबर्न क्रिकेट मैदानावर (Melbourne Cricket Stadium) आज भारत विरुद्ध झिम्बाब्वे T20 विश्वचषक सुपर 12 सामना पार पडणार आहे. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून स्पर्धेतील सर्वात मोठा ट्वीस्ट आणत भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहे. तर आजची मॅच भारत जिंकल्यास भारतीय संघाच्या गुणामध्ये वाढ होईल आणि ही संधी भारतास आणखी वरच्या स्थानावर घेवून जाईल. अंतिम सामन्यापूर्वी वरिष्ठांना विश्रांती देण्यासाठी भारत त्यांच्या संघात काही बदल करू शकतो. ऋषभ पंत, युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांना पहिल्या चार सामन्यांमध्ये यश मिळू न शकल्याने त्यांना इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, हा सामना जिंकून आत्मविश्वास वाढवत उपांत्य फेरीत प्रवेश करणे भारतासाठी महत्त्वाचे असेल. या विजयामुळे भारताची उपांत्य फेरीत इंग्लंडशी लढत होईल.
भारतीय संघाच्या टॉप एलेव्हनमध्ये आज केएल राहुल (KL Rahul), रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), हार्दिक पंड्या (Hardik Pandey), दिनेश कार्तिक (Dinesh Kartik), अक्षर पटेल (Axar Patel), रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin), भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar), मोहम्मद शमी (Mohamad Shami), अर्शदीप सिंग (Arshadip Singh), युझवेंद्र चहल (Yajuvendra Chahal), हर्षल पटेल (Harshal Patel), दीपक हुडा (Deepak Hudda), ऋषभ पंत (Rishabh Pant) हे खेळाडू असतील. (हे ही वाचा:- T20 World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेचा नेदरलँडकडून धक्कादायक पराभव, भारताचा थेट उपांत्य फेरीत समावेश; पाकिस्तानच्या आशा पुन्हा पल्लवीत)
IND विरुद्ध ZIM सामना देखील स्टार स्पोर्ट्स चॅनलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. मेलबर्न स्टेडिअमवर रंगणारा भारत विरुध्द झिम्बाब्वे हा सामना तुम्हाला स्टार स्पोर्ट्स वर बघता येणार आहे. तसेच Disney+ Hoststar या ओटीटी प्लाटफॉर्मवर देखील तुम्ही भारत विरुध्द झिम्बाब्वे सामना तुम्ही सहज बघू शकता.