कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानात पहिले फलंदाजी करून भारताने (India) निर्धारित 20 षटकात 184 धावांपर्यंत मजल मारली आहे मालिकेच्या तिसऱ्या व अंतिम टी-20 सामन्यात न्यूझीलंडला (New Zealand) 185 धावांचे आवाहनात्मक टार्गेट दिले आहे. टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वाधिक 56 धावा ठोकल्या. तसेच अंतिम ओव्हरमध्ये दीपक चाहरच्या (Deepak Chahar) फटकेबाजीने भारताला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. दुसरीकडे, किवी संघासाठी प्रभारी कर्णधार मिचेल सँटनरने (Mitchell Santner) 3 विकेट घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)