IND vs ENG 2nd Test 2021: मोईन अलीच्या फिरकीत अडकला Virat Kohli, इंग्लंड खेळाडूंना सेलिब्रेट करताना पाहातच राहिला टीम इंडिया कर्णधार, पहा Video

क्रिकेटमध्ये असे कमी वेळा पाहिले जाते जेव्हा एखाद्या फलंदाजाला तो कसा बाद झाला जे समजतच नाही आणि आज इंग्लंडविरुद्ध असे काहीसे टीम इंडिया कर्णधार विराट सोबत घडले. मालिकेच्या या दुसर्‍या सामन्याच्या पहिल्या डावात कर्णधार कोहलीला खातेही उघडता आले नाही. आणि जेव्हा इंग्लंड खेळाडूंनी सेलिब्रेट करायला सुरुवात केली तेव्हा तो पाहतच राहिला कारण आपण कसा आऊट झालो हे सामंजलेच नाही.

IND vs ENG 2nd Test 2021: मोईन अलीच्या फिरकीत अडकला Virat Kohli, इंग्लंड खेळाडूंना सेलिब्रेट करताना पाहातच राहिला टीम इंडिया कर्णधार, पहा Video
मोईन अलीने उडवला विराट कोहलीचा त्रिफळा (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 2nd Test 2021: चेन्नई (Chennai) येथे इंग्लंडविरुद्ध (England) दुसऱ्या टेस्ट सामन्यात चेपॉक स्टेडियमची (Chepauk Stadium) पीच आतापासूनच घातक ठरू लागली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात यजमान भारतीय संघाला (Indian Team) इंग्लंडकडून 227 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि आता दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या लंचपर्यंत संघाने 106 धावांवर 3 विकेट गमावल्या आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सामन्यात नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला पण, इंग्लंड गोलंदाज सुरुवातीलाच आघाडीच्या भारतीय फलंदाजांवर भारी पडले. क्रिकेटमध्ये असे कमी वेळा पाहिले जाते जेव्हा एखाद्या फलंदाजाला तो कसा बाद झाला जे समजतच नाही आणि आज इंग्लंडविरुद्ध असे काहीसे टीम इंडिया (Team India) कर्णधार विराट सोबत घडले. मालिकेच्या या दुसर्‍या सामन्याच्या पहिल्या डावात कर्णधार कोहलीला खातेही उघडता आले नाही. आणि जेव्हा इंग्लंड खेळाडूंनी सेलिब्रेट करायला सुरुवात केली तेव्हा तो पाहतच राहिला कारण आपण कसा आऊट झालो हे सामंजलेच नाही. (IND vs ENG 2nd Test Day 1: 'हिटमॅन' रोहित शर्माचे शानदार अर्धशतक, शुभमन, पुजारा कोहली आऊट; लंचपर्यंत टीम इंडियाच्या 3 बाद 106 धावा)

मोईन अलीच्या (Moeen Ali) जबरदस्त 22व्या ओव्हरच्या चेंडूवर जबरदस्त फिरकी घेतलेल्या चेंडूवर विराट त्रिफळाचीत झाला. ऑफ-स्टम्पच्या बाहेर टप्पा घेऊन विराटच्या बॅटच्या आतून जात चेंडूने थेट बेल्स उडवल्या. यासह मोईनसह इंग्लंड खेळाडूंनी विराटची विकेट साजरी करण्यास सुरुवात केली, मात्र भारतीय कर्णधार विकेटवरच स्तब्ध उभा राहिला कारण त्याला आपण कसे आऊट झालो हे समजलेच नाही. हेच कारण होते की त्याने नॉन-स्ट्रायकरला उभे असलेल्या रोहित शर्माला जाऊन मी स्टँप आऊट झालो आहे का? असे विचारले. याचा निर्णय अखेर थर्ड अंपायरने दिला. रिप्लेमाहे कोहली क्लीन बोल्ड झाला असल्याचे स्पष्ट दिसून आले आणि कोहली 5 चेंडूसाठी 6 मिनिटं क्रीजवर टिकला.

दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये विराट 11व्या वेळी शून्यावर बाद झाला आहे. तत्पूर्वी, शुभमन गिल शून्यावरही बाद झाला, तर चेतेश्वर पुजाराने 21 धावा केल्या. रोहित शर्माने डावादरम्यान आपले 12वे कसोटी अर्धशतक झळकावले आणि सामन्याच्या दुसर्‍या षटकात गिल आऊट होऊनही आक्रमक खेळ करत राहिला. दुसर्‍या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सध्या चार सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 0-1 ने पिछाडीवर आहेत आणि दुसर्‍या कसोटीत पराभवाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्रता शर्यतीतून बाहेर पडू शकतात.

(The above story first appeared on LatestLY on Feb 13, 2021 12:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).