Mohammad Nabi (Photo: Getty Image)

सोशल मीडियावर आज-काल सत्य आणि खोटी घटना काही सेकंदातच व्हायरल होतात. आणि आता अशाच एका बातमीचा शिकार अफगाणिस्तानचा (Afghanistan) क्रिकेटर मोहम्मद नबी (Mohammad Nabi) बनला आहे. शुक्रवार, 4 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर अशा बातमी व्हायरल झाली की अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा अष्टपैलू मोहम्मद नबी याचे निधन झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातमीनुसार नबीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. यावर बर्‍याच लोकांनी शोक व्यक्त केला. तर, 34 वर्षीय नबीलाजेव्हा हे कळले तेव्हा त्याने त्यांच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचे ट्विटवरून सांगितले आणि तो पूर्णपणे ठीक असल्याचे देखील त्याने म्हटले.

नबीने ट्विट करत लिहिले की, “अल्हमदुल्लाह मी ठीक आहे. माझ्या मृत्यूशी संबंधित एक बातमी काही मीडिया आउटलेटवर आहे जी बनावट आहे. धन्यवाद". दरम्यान, नबीच्या या ट्वीटपूर्वी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रशिक्षण सत्रातील नबी दिसल्याचे फोटोज शेअर केले होते. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने लिहिले की त्याची टीम काबिल स्टेडियमवर प्रशिक्षण घेत आहे.असे असूनही, ही बातमी व्हायरल होत राहिली आणि त्यानंतर स्वत: नबीने याचे खंडन केले.

दुसरीकडे, नबीने नुकतेच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मागील महिन्यात बांग्लादेशविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळत त्याने रेड बॉल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अफगाणिस्तान संघासाठी नबीने एकूण 3 कसोटी सामने खेळले आहेत. अफगाणिस्तान संघाचा पहिला कसोटी सामना 2018 मध्ये नबीने भारताविरुद्ध सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.