Devkisan Sarda Passes Away: दैनिक ‘देशदूत’चे संस्थापक आणि प्रख्यात उद्योजक देवकिसन सारडा यांचे निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

देवकिसन सारडा यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. ते 92 वर्षांचे होते. सह्याद्री रुग्णालयात दुपारी 2.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

Devkisan Sarda Passes Away: दैनिक ‘देशदूत’चे संस्थापक आणि प्रख्यात उद्योजक देवकिसन सारडा यांचे निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Devkisan Sarda Passes Away

Devkisan Sarda Passes Away: उद्योगपती आणि ‘देशदूत’ या मराठी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक देवकिसन सारडा यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. ते 92 वर्षांचे होते. सह्याद्री रुग्णालयात दुपारी 2.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थीवावर नाशिक अमरधाम येथील विद्यूत दाहीनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सारडा यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. त्यांनी 1959 मध्ये श्री सिन्नर मर्चंट बँकेची स्थापना केली आणि 1963 ते 1967 पर्यंत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले. सारडा यांचे नाशिक शहर, जिल्हा आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील योगदान मोठे आहे. नाशिक, अहमदनगर, सोलापूर व बुलढाणा जिल्ह्यांतील नागरी सहकारी बँका सुरू होण्यास त्यांचा हातभार लागला आहे.  सहकार चळवळ वाढविण्यात आणि रूजविण्यात त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे.

देवकिसन सारडा यांचे निधन-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 20, 2024 09:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).