
How to buy CSK vs MI IPL ticket: सामन्याची तिकिटे आज 19 मार्च 2025 पासून सकाळी 10.15 वाजता अधिकृत ऑनलाइन प्लॅटफॉर्म district.in द्वारे सुरू होतील. चाहते परवडणाऱ्या किंमतींवर आसन पर्यायांमधून तिकिट निवडू शकतात. सी, डी आणि ई लोअर स्टँडची किंमत ो1,700 रुपये आहे. तर आय, जे आणि के अप्पर स्टँडची तिकिटे 2,500 रुपये आहे. सी, डी आणि ई अप्पर स्टँडच्या तिकिटांची किंमत 3,500 रुपये आहे. आय, जे आणि के लोअर स्टँडच्या तिकिटांची किंमत 4,000 रुपये आहे. केएमके टेरेसमध्ये प्रीमियम आसन व्यवस्था 7,500 रुपयांना उपलब्ध आहे.
आयपीएल2025 सीएसके विरुद्ध एमआय सामना कधी आहे?
आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना 23 मार्च (रविवार) रोजी संध्याकाळी 7.30 वाजता भारतीय वेळेनुसार होईल.
आयपीएल 2025 मध्ये सीएसके विरुद्ध एमआय सामना कुठे खेळला जाईल?
आयपीएल 2025 मध्ये सीएसके विरुद्ध एमआय सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल. स्टेडियमला चेपॉक असेही म्हणतात.
आयपीएल 2025 मधील सीएसके विरुद्ध एमआय सामन्यासाठी तिकिटांची विक्री कधी सुरू होईल?
आयपीएल 2025 मधील सीएसके विरुद्ध एमआय सामन्याची तिकिटे आज 19 मार्च (बुधवार) सकाळी 10:15 वाजल्यापासून ऑनलाइन बुक करता येतील.
आयपीएल 2025 मधील सीएसके विरुद्ध एमआय सामन्यासाठी तिकिटांचे दर काय आहेत?
आयपीएल 2025 मधील सीएसके विरुद्ध एमआय सामन्यासाठी निवडलेल्या स्टँडनुसार तिकिटांच्या किमती 1700 ते 7500 रुपयांपर्यंत आहेत.