Smriti Mandhana And Harmanpreet Kaur (Photo Credit - X)

Mumbai Indians Women vs Delhi Capitals Women WPL 2025: महिला प्रीमियर लीग 2025 चा दुसरा सामना 15 फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स महिला आणि दिल्ली कॅपिटल्स महिला यांच्यात खेळवण्यात आला. या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा दोन विकेट्सने पराभव केला. दरम्यान, हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) एक मोठी कामगिरी केली. टी-20 क्रिकेटमध्ये तिच्या 8000 धावा पूर्ण केल्या. यासह, दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. या सामन्यात मुंबईकडून नॅट सायव्हर-ब्रंटने 80 धावा आणि हरमनप्रीत कौरने 42 धावा केल्या. या सामन्यात हरमनप्रीत कौरने 22 चेंडूत 42 धावांची खेळी केली. ज्यामध्ये त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले.

हे देखील वाचा:MI W vs DC W Run Out Controversies: शेवटच्या चेंडूवर दिल्लीचा शानदार विजय, पण पंचाच्या निर्णयावरून पेटला वाद; मुंबईसोबत झाली चिटींग?

मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या तिच्या संघाच्या सामन्यादरम्यान टी-20 क्रिकेटमध्ये तिच्या 8000 धावा पूर्ण केल्या. स्मृती मानधना नंतर टी-20 क्रिकेटमध्ये 8000 धावा पूर्ण करणारी हरमनप्रीत दुसरी भारतीय फलंदाज ठरली आहे. हरमनप्रीतला हा टप्पा गाठण्यासाठी 37 धावांची आवश्यकता होती आणि तिने पहिल्या डावाच्या 11 व्या षटकात हा टप्पा गाठला.

टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू

खेळाडू                          धावा

स्मृती मानधना          8349

हरमनप्रीत कौर        8005

जेमिमा रॉड्रिग्स        5826

शेफाली वर्मा            4542

मिताली राज            4329

दीप्ति शर्मा              3889

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, हरमनप्रीत कौरने 178 टी-20 सामन्यांमध्ये 3589 धावा केल्या आहेत आणि यासोबतच तिने तिच्या स्थानिक संघ पंजाबसाठीही चमकदार कामगिरी केली आहे. स्मृती मानधनाच्या नावावर सध्या 8349 धावा आहेत, तर जेमिमा रॉड्रिग्ज यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ज्याने त्याच्या छोट्या कारकिर्दीत आतापर्यंत 5826 धावा केल्या आहेत.