T20 World Cup 2021: इंडियन प्रीमियर लीगने (Indian Premier League) भारतीय युवा खेळाडूंना संधी मिळवून टीम इंडियाकडून (Team India) खेळण्यासाठी नेहमीच एक योग्य व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. अनुभवी परदेशी आणि भारतीय खेळाडूंसह ड्रेसिंग रूम सामायिक करण्याच्या प्रक्रियेने भारताच्या तरुणांना चांगलाच फायदा झाला आहे. आयसीसी टी -20 वर्ल्ड कप 2021 अवघे काही महिने दूर आहे आणि आयपीएल (IPL) 2021 मध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या काही प्रतिभावान भारतीय खेळाडूंना विश्वचषकच्या (World Cup) भारतीय संघात (Indian Team) संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्याचा भारतीय संघ चांगला आहे पण या नवोदित खेळाडूंच्या समावेशाने टीम अधिक बळकट होईल. येथे आपण 4 अनकॅप्ड खेळाडूंबद्दल जाणून घेऊया जे संभाव्य चांगल्या आयपीएल हंगामानंतर टीम इंडियात सामील होऊ शकतात.
1. देवदत्त पडिक्क्ल (Devdutt Padikkal)
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आरसीबी) सलामीवीर देवदत्त पडिक्क्लचे नाव या यादीत साहजिक आहे. पडिक्क्ल उत्कृष्ट श्रेणी आणि अभिजाततेसह खेळतो. आयपीएलमधील जागतिक दर्जाच्या गोलंदाजांविरुद्ध खेळताना त्याला पहिले की तो आंतरराष्ट्रीय स्तराचा असल्याचं दिसून येतं. शिवाय, सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या पदीक्कलने आयपीएल 2021 मध्ये यापूर्वी शतक ठोकले आहे आणि आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तो नक्कीच निवड समितीच्या रडारवर असेल.
2. चेतन सकारिया (Chetan Sakariya)
डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांची भारतामध्ये नेहमीच तूट असेल आणि टी नटराजनच्या सतत दुखापतीमुळे टीम इंडियाला बॅकअप तयार ठेवणे आवश्यक आहे. राजस्थान रॉयल्स डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया एक उपयुक्त पर्याय सिद्ध होऊ शकतो. सकारियाने आपले स्लो चेंडू आणि वेगवान बदल यामुळे आयपीएलमधील अनेक फलंदाजांना त्रास दिला आहे आणि तो आयपीएलच्या पहिल्या मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांपैकी एक आहे. सकारियाने आत्तापर्यंत 7 विकेट घेतल्या आहेत आणि टीम इंडियासाठी निश्चितच ही चांगली निवड आहे.
3. अवेश खान (Avesh Khan)
आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज अवेश खान आपल्या धडकी भरवणारा गोलंदाजीने चर्चेत आला आहे. अवेशने आतापर्यंत आयपीएलमध्ये 13 विकेट्स काढल्या आहेत ज्यामध्ये विराट कोहली आणि एमएस धोनी सारख्या मोठ्या नावाचाही समावेश आहे. बऱ्याच भिन्न गोलंदाजीने आगामी वर्ल्ड कपसाठी अवेश टीम इंडियासाठी चांगली निवड ठरू शकेल.
4. हर्षल पटेल (Harshal Patel)
आयपीएल 2021 मध्ये आरसीबीने आतापर्यंत उत्तम कामगिरी मागील मुख्य कारण म्हणजे डेथ गोलंदाजीतील संतुलन आणि हर्षल पटेल याचा मुख्य शिल्पकार ठरला आहे. त्याने आतापर्यंत 6 सामन्यात 17 विकेट्स घेतल्या असल्या असून विराटसाठी एक विकेट-टेकर गोलंदाज ठरला आहे. आयपीएल 2021 च्या पहिल्या सामन्यातही पटेलने मुंबई इंडियन्सविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या आणि या स्वरुपात आपल्या अधिकारावर शिक्कामोर्तब केले आहे. तो भारतीय संघात चांगली भर घालू शकतो.