PC-X

Fans Claim To Won Rohit Sharma's Lamborghini: सोशल मिडीयावर सध्या रोहित शर्माची लॅम्बोर्गिनी '0264' जोरदार चर्चेत आहे. आयपीएलची(Indian Premier League) क्रेज वाढवण्यासाठी याआधी एका जाहिरातीत रोहित शर्माने (Rohit Sharma) ड्रीम 11 स्पर्धा जिंकणाऱ्या चाहत्याला त्याची खास नंबर प्लेट असलेली लॅम्बोर्गिनी (Lamborghini) देण्याची घोषणा केली होती. त्यावर आता काही जणांनी त्याची लॅम्बोर्गिनी आणि 3 कोटी जिंकल्याचा दावा केला आहे. चाहत्यांनी रोहित शर्माच्या खास '0264' नंबर प्लेटसह लॅम्बोर्गिनी जिंकण्याचा दावा केला आहे. 'चेतन बोरकर' आणि 'जगदीश' अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये, ड्रीम11 चार्टमध्ये अव्वल स्थान मिळवल्याबद्दल रोहित शर्माची कार आणि 3 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जिंकल्याचा दावा केला आहे.

दोन्ही अकाउंट्सवर लॅम्बोर्गिनी चालवतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. जे व्हायरल झाले आहेत. त्याशिवाय, केकेआर विरुद्ध आरसीबी ड्रीम11 फॅन्टसी टीम स्पर्धा 'युवराज वाघ' नावाच्या व्यक्तीने जिंकल्याचे देखील समोर आले आहे. ड्रीम11 चे सीईओ हर्ष जैन यांच्यासोबत त्याचा फोटो त्याने सोशल मिडीयावर टाकला आहे. त्याने रोहित शर्माचा 'लॅम्बोर्गिनी' जिंकली आहे की नाही हे निश्चित झालेले नाही. मात्र, त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील अनेक पोस्टमध्ये असा दावा केला आहे की त्याने रोहित शर्माची लॅम्बोर्गिनी आणि 3 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देखील जिंकली आहे. तिघांनी केलेल्या या दाव्यांमध्ये, रोहित शर्माच्या 'लॅम्बोर्गिनी'चा खरा विजेता कोण आहे हे निश्चित झालेले नाही. त्याशिवाय, ड्रीम 11 कडून याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

रोहित शर्माची जाहिरात

रोहित शर्माची लॅम्बोर्गिनी जिंकल्याचा चाहत्याचा दावा

 

View this post on Instagram

 

A post shared by JAGDISH (@muler46tuuuu)

रोहित शर्माच्या लॅम्बोर्गिनीसोबत चाहत्याची पोझ

 

View this post on Instagram

 

A post shared by Chetan Borkar (@chetan_borkar_1320)

रोहित शर्मा हा देशातील सर्वात आवडत्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. काहजण त्याला मुंबईचा राजा म्हणून पाहतात. त्याची कार आपल्याकडे असणे ही कोणत्याही चाहत्यासाठी मोठी गोष्ट आहे. नुकतच त्याच्या नेतृत्वात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद भारताला मिळाले. त्यामुळे तो दोन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा दुसरा भारतीय कर्णधार बनला आहे.