PC-X

Robin Hood' Trailer Launch: क्रीडा जगत गाजवल्यानंतर माजी ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आता दिग्दर्शक वेंकी कुडुमुला यांच्या आगामी अॅक्शन चित्रपट 'रॉबिन हूड' मधून कलाविश्वात पदार्पण करत आहे. ट्रेलर लाँच कार्यक्रमासाठी वॉर्नर हैदराबादमध्ये पोहोचला आहे. मूव्ही मेकर्सनी इंस्टाग्रामवर डेव्हिड वॉर्नरचे फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये लिहिले की, "डेव्हिड भाई आज रॉबिन हूड ट्रेलर लाँच आणि भव्य प्री-रिलीज कार्यक्रमासाठी हैदराबादमध्ये पोहोचले आहेत. हा चित्रपट 28 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे."

दिग्दर्शक वेंकी कुडुमुला यांच्या आगामी तेलुगू अ‍ॅक्शनपट 'रॉबिन हूड'च्या मागे असलेली निर्मिती संस्था मैत्री मूव्ही मेकर्सने अलीकडेच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचे भारतीय चित्रपटसृष्टीत अधिकृतपणे स्वागत करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. या प्रॉडक्शन हाऊसने त्यांच्या एक्स हँडलवर वॉर्नरचा पोस्टर रिलीज केला आणि लिहिले की, "मैदानात आपली छाप सोडल्यानंतर, आता 'रॉबिन हूड' चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर चमकण्याची वेळ आली आहे. चित्रपटात डेव्हिड वॉर्नर कॅमिओमध्ये दिसणार आहे. रॉबिन हूड 28 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल."

'रॉबिन हुड' या चित्रपटातून भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना डेव्हिड वॉर्नर म्हणाला, "या चित्रपटाच्या चित्रीकरणात मला खूप मजा आली. मी भारतीय चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहे."