CSK vs DC IPL 2021: ‘गुरु vs चेला, बहुत मजा आएगा!’ एमएस धोनी-रिषभ पंत आयपीएल सामन्यात ‘आमने-सामने’, उत्साही Ravi Shastri यांनी केले मजेशीर ट्विट
रिषभ पंत आणि एमएस धोनी (Photo Credit: Twitter)

CSK vs DC IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) दरम्यान सुपरहिट सामना असणार आहे. दोन्ही संघांमधील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. आयपीएल (IPL) 14च्या सुरुवातीपूर्वीच दिल्ली संघाला मोठा झटका बसला जेव्हा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरला भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेदरम्यान खांद्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून माघारी घ्यावी लागली. त्यानंतर दिल्लीने युवा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतकडे (Rishabh Pant) कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली. त्यांच्या नेतृत्वात टीम आयपीएलच्या पहिल्या विजेतेपदाच्या शोधात मैदानात उतरेल. या सामन्याबद्दल टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी एक मजेदार ट्विट पोस्ट केले आहे. दिल्ली कॅपिटल्स मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सामन्याने यंदाच्या हंगामाची सुरुवात करतील. (IPL 2021: एमएस धोनीविरुद्ध Rishabh Pant करणार कॅप्टन्सी डेब्यू, CSK विरोधात बनवली ही विशेष योजना Watch Video)

धोनी आणि पंत या गुरु शिष्यांमध्ये हा ‘ब्लॉकबस्टर’ सामना रंगणार असल्यामुळे या सामन्यासह टीम इंडियाच्या गुरु-शिष्याच्या जोडीवरही चाहत्यांचे लक्ष लागून असणार आहे. शिवाय, राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री देखील या दोन खेळाडूंमधील सामन्यासाठी उत्सुक आहेत. या जोडीबाबत शास्त्री यांनी हटके ट्विट करत लिहिलं की, “गुरु विरुद्ध शिष्य फार मजा येणार. स्टंप माईकवरील कॉमेंट्री नक्की ऐका.” धोनी आणि पंत हे दोन्ही आयपीएलमध्ये आपल्या संघासाठी विकेटकीपिंग करतात. शिवाय, विकेटच्या मागे पंतची बडबड नेहमी चांगलीच चर्चेत राहते. दोन्ही खेळाडू याद्वारे संघातील खेळाडूंचे मनोरंजन आणि मार्गदर्शन करतात. त्यांच्या मजेदार कमेंट्स देखील अनेकदा स्टम्प माइकद्वारे चाहत्यांना ऐकू येतात.

दरम्यान, दोन्ही संघांच्या कामगिरीबद्दल बोलताना, दिल्लीने गेल्या वर्षी आयपीएल 2020 मध्ये अंतिम फेरीपर्यंत प्रवेश केला होता, जिथे त्यांना मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. आयपीएलच्या इतिहासातील दिल्लीची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जच्या कामगिरीचा विचार केल्यास मागील सत्रात संघ पहिल्यांदा प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकला नाही. विशेष म्हणजे महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने एकूण तीन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.