एमएस धोनी, सीएसके कर्णधार (Photo Credit: PTI)

MS Dhoni Ducks in IPL: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) 14व्या मोसमाची निराशाजनक सुरुवात झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात धोनीला भोपळाही फोडता आला नाही. दिल्लीचा वेगवान गोलंदाज आवेश खानने (Avesh Khan) ओव्हरच्या दुसऱ्याच चेंडूवर धोनीचा त्रिफळा उडवला. दुसर्‍याच बॉलवर चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारने सामन्यात जोरदार शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू बॅटच्या आतील किनार्‍याला लागून विकेटला लागला. धोनी बाद झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. एमएस धोनीची शून्यावर (MS Dhoni Ducks) बाद होणे देखील एक मोठी गोष्ट आहे कारण सुपर किंग्स संघाचा कर्णधार आयपीएलमध्ये फक्त चौथ्यांदाच शून्यावर आऊट झाला आहे. आयपीएल (IPL) 2010 मध्ये धोनी दोनदा शून्यावर बाद झाला होता. यानंतर 2015 मध्ये धोनी मुंबई इंडियन्सविरुद्ध खाते उघडू शकला नाही. (CSK vs DC IPL 2021: Suresh Raina, सॅम कुरनच्या फटकेबाजीपुढे दिल्लीची दाणादाण, सुपर किंग्सने उभारला 188 धावांचा डोंगर)

दरम्यान, 2015 नंतर धोनी पहिल्यांदा शून्यावर बाद झाला असून तर दिल्लीस्थित फ्रँचायझीविरुद्ध तो दुसऱ्यांदा भोपळा फोडू शकला नाही. वेगवान गोलंदाज अवेश खान धोनीला शून्यावर बाद करणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हर्षभजन सिंहने शून्यावर धोनीचा काटा काढला होता. शेन वॉटसन आणि डर्क नानेस यांनीही धोनीला आयपीएलमध्ये खाते न उघडू देता पॅव्हिलियनमध्ये पाठवले आहे. पुनरागमनानंतर फलंदाज सुरेश रैना अर्धशतक करून आऊट झाल्यानंतर धोनी फलंदाजीसाठी मैदानात उतरला, पण क्रीजवर फक्त दोन चेंडूपर्यंतच टिकू शकला. उल्लेखनीय म्हणजे, धोनीला आयपीएल 2020 मध्ये संघर्ष करावा होता आणि 14 सामन्यात तो फक्त 200 धावाच करू शकला होता. दरम्यान, आयपीएल 2021 च्या संघाच्या सलामीच्या सामन्यात रैनाने 32 चेंडूत अर्धशतक ठोकले. आयपीएलमधील सर्वाधिक अर्धशतकांच्या यादीत विराट कोहली आणि रोहित शर्माची बरोबरी करत रैनाने 39वे आयपीएल अर्धशतक ठोकले.

सामन्याबद्दल बोलायचे तर सुपर किंग्जने दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 189 धावांचा आव्हान दिले आहे. चेन्नईकडून मिस्टर आयपीएल रैनाने सर्वाधिक 54 धावा केल्या. मोईन अलीने 36 तर सॅम कुरनने 34 धावांची खेळी केली. दिल्लीकडून आवेश खान आणि क्रिस वोक्सच्या जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.