वॉल्ट डिस्ने कंपनीत पुन्हा एकदा नोकर कपात होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, अमेरिकन टेक आणि एंटरटेनमेंट कंपनीमध्ये दुसऱ्या फेरीच्या कर्मचारी कपातीचे नियोजन सुरू आहे. अशा परिस्थितीत हजारो लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका वाढला आहे. कंपनी सुमारे 7,000 पदे रद्द करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्या फेरीच्या टाळेबंदीमुळे अनेक हजार कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे. अहवालानुसार एका झटक्यात सुमारे 4,000 कर्मचाऱ्यांना वॉल्ट डिस्नेमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. वॉल्ट डिस्नेने याआधी मोठी कर्मचारी कपात केली आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, आता कंपनी 4,000 लोकांना कामावरून काढून टाकू शकते. कर्मचारी कपातीच्या दुसऱ्या फेरीशी संबंधित अंतर्गत मेमो देखील कंपनीमध्ये शेअर केला गेला आहे. (हेही वाचा: HCL Technologies: टाळेबंद आणि वेतन कपातीच्या दरम्यान HCL ने आपल्या 85 टक्के कर्मचार्यांना देणार परिवर्तनीय वेतन)
JUST IN - Walt Disney to cut several thousand more jobs, begins second wave of layoffs — Reuters
— Disclose.tv (@disclosetv) April 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)