वॉल्ट डिस्नेच्या (DIS.N) पिक्सार अॅनिमेशन स्टुडिओने दोन अधिका-यांसह 75 पदे काढून टाकली आहेत. पाठिमागच्या दहा वर्षांमध्ये प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात झाली आहे. या कर्मचारी कपातीमध्ये लाइटइयरचे अधिकारी एंगस मॅकलेन आणि गॅलिन सुस्मन यांचा समावेश आहे. लाइटइयर दिग्दर्शक अँगस मॅकलेन हे पाठिमागील 26 वर्षांपासून वॉल्ट डिस्नेसोबत कार्यरत आहेत. ते एक अॅनिमेटर आहेत. जे “टॉय स्टोरी 4” आणि “कोको” सारख्या प्रशंसित चित्रपटांच्या वरिष्ठ क्रिएटिव्ह टीमचा भाग होते. "लाइटइयर" चे निर्माते गॅलिन सुस्मन यांना देखील काढण्यात आले आहे. जे 1995 मध्ये "टॉय स्टोरी" चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सुस्मान पिक्सारमध्ये होते.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)