याआधी रशियन प्रसारमाध्यमांनी क्रेमलिनच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने माहिती दिली होती की, व्लादिमीर पुतिन यांना 18 महिन्यांपासून कर्करोग आणि पार्किन्सन्सचा आजार झाल्याचे निदान झाले आहे.  हे रोग ऑन्कोलॉजी चाचणीद्वारे ओळखले जातात. मात्र, क्रेमलिनच्या अधिकाऱ्यांनी सतत पुतीन निरोगी असल्याचा दावा सातत्याने केला आहे. आता पुन्हा एकदा क्रेमलिन गुप्तहेर कागदपत्रांमध्ये दावा केला गेला आहे की, व्लादिमीर पुतिन यांना खरच पार्किन्सन्स आणि स्वादुपिंडाचा कर्करोग आहे.

पूर्वी रशियन मीडियाने आपल्या दाव्यात म्हटले होते की, क्रेमलिनच्या सर्वोच्च संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, पुतिन गंभीर वैद्यकीय स्थितीतून जात आहेत. तसेच त्यांना ऑपरेशनची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र शस्त्रक्रियेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)