US Military Chopper Crash: ऑस्ट्रेलियात लष्करी सराव सुरू असताना अमेरिकेचे लष्करी विमान कोसळले आहे. ऑस्ट्रेलियाच्या उत्तर प्रदेशातील डार्विनजवळ हा अपघात झाला. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियन डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, रविवारी सकाळी मेलविल बेटावर एक्सरसाइज प्रिडेटर्स रन 2023 दरम्यान ही घटना घडली. या अपघातात 3 जवान शहीद झाले आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, यावेळी आमचे लक्ष जहाजावरील उर्वरित सैनिकांच्या सुरक्षेवर आहे. एबीसीच्या म्हणण्यानुसार, डार्विनच्या उत्तरेकडील तिवी बेटांजवळ सरावाच्या वेळी विमान क्रॅश झाल्यानंतर आतापर्यंत अनेकांना वाचवण्यात आले आहे. जहाजावर एकूण 23 कर्मचारी होते. तिघांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर इतर पाच जणांना गंभीर अवस्थेत रॉयल डार्विन रुग्णालयात नेण्यात आले, असे अमेरिकेच्या सागरी अधिकाऱ्याने एका निवेदनात म्हटले आहे.
US Military Chopper Crash Update: Marine Corps Aircraft Crashes During Multi-Nation Training Exercise on Melville Island in Australia; Three Killed, 20 Injured#US #Australia #USMilitaryChopperCrash #MaineCorpsAircraftCrash https://t.co/MS6LPTfujL
— LatestLY (@latestly) August 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)