UK PM Keir Starmer Apologizes to Hindu Community: ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी अखेर दिवाळीनिमित्त त्यांच्या घरी आयोजित कार्यक्रमात मांसाहार आणि दारू दिल्याबद्दल माफी मागितली आहे. स्टारमरच्या कार्यालयाने शुक्रवारी पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान-कम-कार्यालय 10 डाउनिंग स्ट्रीट येथे आयोजित पार्टीत झालेल्या 'चुकीसाठी' माफी मागितली आहे. पंतप्रधानांनी दिलेल्या मेजवानीत मांसाहार आणि दारू देणे म्हणजे हिंदूंच्या भावनांशी खेळणे आहे, असे काही ब्रिटिश हिंदूंनी म्हटले होते. डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने या कार्यक्रमात मांसाहार देण्याच्या चुकीचा थेट उल्लेख केला नाही, परंतु भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही हे निश्चितपणे स्पष्ट केले. अशी चूक पुन्हा होणार नाही, अशी ग्वाही त्यांच्या टीमने हिंदू लोकांना दिली आहे. प्रवक्त्याने म्हटले आहे, डाउनिंग स्ट्रीटवर दिवाळी साजरी करणाऱ्या अनेक समुदायांचे स्वागत करताना पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी ब्रिटीश हिंदू, शीख आणि जैन समुदायांच्या देशासाठी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. (हेही वाचा: Ban ISKCON or We Will Kill Devotees: 'इस्कॉनवर बंदी घाला नाहीतर आम्ही भाविकांना मारून टाकू'; इस्लामी गटाचा Muhammad Yunus सरकारला अल्टिमेटम)
यूकेचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी मागितली हिंदू लोकांची माफी -
#UnitedKingdom Prime Minister #KeirStarmer's office apologised for “mistake” after outrage over its food menu during #Diwali reception last month
Know more https://t.co/ySVDpwgh9R pic.twitter.com/qDqarY5wuR
— The Times Of India (@timesofindia) November 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)