British Airways Cabin Crew Racist Video : हॉली वॉल्टन आणि लॉरेन ब्रे या दोन केबिन क्रू महिला सदस्यांनी चिनी (China) प्रवाशांच्या डोळ्याचे हावभाव दाखवत व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. प्रवासादरम्यान, चिनी प्रवाशांनी वाईन ऑर्डर केली होती. व्हिडीओमध्ये हॉली वॉल्टन ही त्यांच्या बोलण्याची आणि डोळ्यांची नक्कल करत आहे. तर, लॉरेन ब्रे हीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर तो टिकटोकवर (Tiktok )पोस्ट केला. या दोघींनी हा व्हिडीओ अँटिग्वामधील ट्रेड विंड्स हॉटेलमध्ये रॅकोर्ड केला आहे. दरम्यान, त्यांच्या या कृत्यानंतर त्यांच्या इतर सहकाऱ्यांकडून दोघींची निंदा करण्यात आली आहे. (हेही वाचा : US on India China Border Dispute : चीनच्या अरुणाचल प्रदेशवरील दाव्याला अमेरिकेचा विरोध; सातत्याने चुकीचा युक्तीवाद करत असल्याचे म्हणत सुनावले )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)