भारत-कॅनडा यांच्यामधील संबंध ताणलेले असताना कॅनडाच्या टोरॅंटो मध्ये खलिस्तान समर्थकांनी मोर्चा काढत Indian Consulate in Toronto समोर भारताचा झेंडा जाळला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याला देखील जोडे मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 100 पेक्षाही कमी खलिस्तानी एकत्र येत त्यांनी खलिस्तानी झेंडे झळकवले. यावेळी गाणी वाजवत त्यांनी भारत देशाविरोधी नारेबारी देखील केली. दरम्यान कॅनडा कडून Hardeep Singh Nijjar यांच्या कॅनडा मध्ये झालेल्या हत्येशी भारत सरकारचा हात असल्याचा समोर आल्यानंतर हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)