लंडनमध्ये तीन अल्पवयीन मुलींची चाकू भोकसून हत्या करणाऱ्या व्यक्तीला 52 वर्षांची शिक्षा सुनावण्यात अली आहे. ज्यावेळी या व्यक्तीने तीन विद्यार्थिनींची हत्या केली तेव्हा तो 17 वर्षांचा होता. इंग्लंडमध्ये टेलर स्विफ्ट-थीम असलेल्या नृत्य वर्गादरम्यान त्याने तीन मुलींची हत्या केली होती. याबाबत शिक्षा सुनावताना न्यायालयाने म्हटले की, ‘हा सर्वात टोकाचा, धक्कादायक आणि अपवादात्मक गंभीर गुन्हा आहे.’ न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच, तो किमान 52 वर्षांची शिक्षा भोगल्यानंतरच पॅरोलसाठी अर्ज करू शकतो. कारण त्याने गुन्हा केला तेव्हा तो 18 वर्षाखालील होता. एक्सेल रुदाकुबाना (Axel Rudakubana) असे आरोपीचे नाव आहे.
उत्तर-पश्चिम इंग्लंडमधील साउथपोर्ट येथे टेलर स्विफ्ट थीमवर आधारित योग आणि नृत्य कार्यशाळेत जुलै 2024 मध्ये त्याने हा गंभीर गुन्हा केला. रुदाकुबानाने वर्गात मुलांवर हल्ला केला व तीन अल्पवयीन मुलींची हत्या केली. या हल्ल्यात शिक्षकांसह 7 ते 13 वयोगटातील इतर आठ मुले जखमी झाली होती. आरोपीने 23 जानेवारी रोजी न्यायालयात दोषारोप स्वीकारले. आरोपी रुदाकुबाना हा वेल्सची राजधानी कार्डिफ येथील रहिवासी असून त्याचे गुन्ह्यांशी जुने संबंध आहेत. लिव्हरपूल क्राउन कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायाधीश ज्युलियन गूस म्हणाले की, जर हल्ल्याच्या वेळी रुदाकुबाना 18 वर्षांचा असता तर त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असती. मात्र, तो त्यावेळी 17 वर्षांचा होता त्यामुळे 52 वर्षे शिक्षा भोगल्यानंतर तो पॅरोलसाठी अर्ज करू शकतो. (हेही वाचा: Indian Student Shot Dead in US: वॉशिंग्टनमध्ये हैदराबादमधील तरुणाची गोळ्या घालून हत्या)
Teen Sentenced To 52 Years In Prison:
Southport Stabbing: British teen sentenced to 52 years in jail for murder
Diksha Bisla brings you this report
Watch more at https://t.co/dm7SyC01cG pic.twitter.com/m68uwJVvtZ
— WION (@WIONews) January 24, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)