गेल्या दीड वर्षात पाकिस्तानमधून महागाईसंदर्भात अनेक बातम्या समोर आल्या आहेत. कधी पीठ-डाळीवरून तर कधी पेट्रोल-डिझेलवरून लोकांमध्ये हाणामारी झाल्याच्याही बातम्या येत होत्या. आता याच संदर्भात आणखी एक बातमी समोर आली आहे. महागाईशी झुंजत असलेल्या पाकिस्तानमध्ये अमेरिकेच्या फास्ट फूड चेन सबवेने तीन इंची सँडविच लाँच केले आहे. प्रथमच, या फास्ट-फूड चेनने जागतिक स्तरावर सँडविचची छोटी आवृत्ती लाँच केली आहे, ज्याची किंमत 360 पाकिस्तानी रुपये आहे. सबवे सहसा 6-इंच आणि 12-इंच आकाराचा सँडविच विकतो, परंतु पाकिस्तानमधील लोकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांनी मेन्यूमध्ये मिनी सँडविच जोडले आहे. पाकिस्तानमध्ये ऑगस्टमध्ये, वार्षिक आधारावर महागाई दर 27.38% होता. पाकिस्तानमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने अन्नधान्य महागाई 38.5 टक्क्यांवर पोहोचली आहे. एक वर्षापूर्वी ऑगस्टमध्ये ती 6.2% होती. (हेही वाचा: Pakistan General Election 2023 Date: राष्ट्रपतींनी पाकिस्तानात 'बंड' केले सुरू! निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली ही मागणी)
#Subway Launches First Ever 3-Inch Mini Sandwich To Tackle Pakistan's Inflation.https://t.co/E4aqBpzpm2 pic.twitter.com/fuUvzrZvmk
— TIMES NOW (@TimesNow) September 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)