Russia Military Plane Accident: रशियामध्ये मोठा विमान अपघात झाला आहे. युक्रेनियन कैद्यांना घेऊन जाणारे विमान रशियात कोसळले आहे. पश्चिम बेल्गोरोड भागात रशियाच्या वेळेनुसार सकाळी 11 वाजता हा अपघात झाला. या विमानात 65 कैदी होते. राज्यपाल व्याचेस्लाव ग्लॅडकोव्ह यांनी अपघाताची पुष्टी केली. हे रशियाचे IL-76 लष्करी वाहतूक विमान आहे. विमानातील सर्व कैद्यांचा मृत्यू झाल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. विमान क्रॅश झाले तेव्हा सहा क्रू मेंबर्स आणि तीन रक्षकांसह 74 जण विमानात होते, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. अहवालानुसार या सर्वांचा मृत्यू झाला आहे. आरटी इंडियाने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये, एक रशियन लष्करी वाहतूक विमान अचानक वेगाने खाली उतरताना आणि छोट्या रिफायनरीपासून काही अंतरावर कोसळताना दिसत आहे. अपघातानंतर विमानाला आग लागली. अपघाताच्या कारणाचा शोध सुरू आहे.

रशियन लष्करी Il-76 हे लष्करी वाहतूक विमान आहे जे सैन्य, मालवाहू, लष्करी उपकरणे आणि शस्त्रे वाहतूक करण्यासाठी वापरले जाते. या विमानात साधारणपणे पाच लोकांचा क्रू असतो आणि ते 90 प्रवासी घेऊन जाऊ शकतात. (हेही वाचा: US Shocker: इलिनॉय येथे सामुहित गोळीबार, आठ जण ठार, संशयित आरोपीची आत्महत्या)

पहा व्हिडिओ- 

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)