Quad Summit 2024: युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष जो बिडेन हे शनिवार, 21 सप्टेंबर रोजी विल्मिंग्टन, डेलावेअर येथे चौथ्या वैयक्तिक क्वाड लीडर्स समिटचे आयोजन करणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा या महत्त्वपूर्ण शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. ही शिखर परिषद विशेष महत्त्वाची आहे, कारण सध्याच्या क्वाड नेत्यांची ही शेवटची बैठक असू शकते. राष्ट्राध्यक्ष बिडेन आणि जपानचे पंतप्रधान किशिदा या दोघांनीही आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. भारत पुढील क्वाड समिटचे आयोजन करणार आहे.

या परिषदेत चार देशांमधील धोरणात्मक सहकार्य मजबूत करण्यावर आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशातील मुक्त क्षेत्राच्या सामायिक दृष्टिकोनाला पुढे नेण्यावर भर दिला जाईल. चर्चेच्या प्रमुख मुद्यांमध्ये आरोग्य सुरक्षा, आपत्ती प्रतिसाद, सागरी सुरक्षा, पायाभूत सुविधांचा विकास, उदयोन्मुख तंत्रज्ञान, हवामान बदल, स्वच्छ ऊर्जा आणि सायबर सुरक्षा यांचा समावेश असेल. (हेही वाचा: Mohamed Muizzu to Visit India Soon: मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू लवकरच भारत दौऱ्यावर; दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ करण्यावर भर)

जो बिडेन करणार क्वाड समिटचे आयोजन-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)