पाकिस्तान हा देशाच्या इतिहासातील सर्वात वाईट महागाईचा सामना करत आहे. देशातील महागाई 45 वर्षांच्या उच्चांकावर गेल्याने पाकिस्तान दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये रोखीची कमतरता इतकी जास्त आहे की, लोकांकडे मूलभूत रेशनसाठी पैसे नाहीत. अशा स्थितीत टॉम हॉर्टन्सने लाहोरमध्ये आपले देशातील पहिले आउटलेट उघडले आहेत. परंतु तुम्हाला हे पाहून आश्चर्य वाटेल की, पाकिस्तानमध्ये जिथे लोकांच्याकडे दोन वेळच्या जेवणाला पैसे नाहीत, तिथे या प्रसिद्ध कॅनेडियन कॉफी शॉपच्या बाहेर श्रीमंत पाकिस्तानी लोकांच्या रांगा लागल्या होत्या.

सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून, ज्यामध्ये दिसत आहे की टॉम हॉर्टन्स कॉफी शॉपच्या बाहेर मोठीच्या मोठी रांग लागली आहे. टॉम हॉर्टन्सने डीएचए लाहोरच्या फेज 6 मध्ये पहिले आणि फ्लॅगशिप आउटलेट उघडले तेव्हा वीकेंडला इथे प्रचंड गर्दी झाली होती. पाकिस्तानमध्ये  9 फेब्रुवारीपर्यंत परकीय चलन साठा $3 अब्ज (नऊ वर्षांचा नीचांकी) खाली आल्याने, देशाची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे. अशात टिम हॉर्टन्सने पाकिस्तानमध्ये कंपनीच्या इतिहासामधील सर्वाधिक ओपनिंग विक्री नोंदवली आहे. कॅनेडियन कॉफी ब्रँडच्या पाकिस्तानी फ्रँचायझीने जगभरातील सर्व 5,352 आउटलेटला मागे टाकले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)