World’s Oldest Man Passes Away: जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती जॉन टिनिसवूड यांचे वयाच्या 112 व्या वर्षी साउथपोर्ट येथील केअर होममध्ये निधन झाले. जॉन टिनिसवुडचा जन्म लिव्हरपूलमध्ये 26 ऑगस्ट 1912 रोजी झाला होता, ज्या वर्षी टायटॅनिक बुडाले. या वर्षी एप्रिलमध्ये ते जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती बनले होते. एप्रिल 2024 मध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्डद्वारे जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले गेले. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मिस्टर टिनिसवुड यांचे शेवटचे दिवस 'संगीत आणि प्रेमाने' भारलेले होते'. (हेही वाचा: Double ‘Suicide Pod’ मध्ये 46 वर्ष संसार केलेलं ब्रिटीश जोडपं एकत्र कवटाळणार मृत्यूला; पत्नीला Dementia चं निदान झाल्याने घेतला निर्णय)
John Tinniswood, the world's oldest man, has died at age 112 pic.twitter.com/q7wYWddpeg
— BNO News (@BNONews) November 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)