नुकतेच अमेरिकेच्या कॅपिटल हिल येथे पहिली हिंदू-अमेरिकन शिखर परिषद पार पडली. यावेळी या परिषदेला पाठिंबा देण्यासाठी आलेले रिपब्लिकन खासदार रिच मॅककॉर्मिक म्हणाले की, अमेरिकेच्या विकासात हिंदू समुदायाचे मोठे योगदान आहे. या समुदायात इतकी ताकद आहे की ते अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष कोण हे ठरवू शकतात. अमेरिकेच्या पुढच्या राष्ट्राध्यक्षाची ‘खऱ्या अर्थाने निवड’ करण्याचे सामर्थ्य आत्म-जागरूक हिंदू-अमेरिकन लोकांकडे आहे, असे या अमेरिकन काँग्रेस सदस्याने म्हटले आहे. या शिखर परिषदेसाठी देशभरातील हिंदू समुदायाचे नेते यूएस कॅपिटलमध्ये जमले होते. Americans4Hindus ने आयोजित केलेल्या या समिटला इतर 20 संघटनांनीही पाठिंबा दिला.

यावेळी भारतीय-अमेरिकन खासदार ठाणेदार यांनी यूएस काँग्रेसमध्ये 'हिंदू कॉकस' स्थापन करण्याची योजना जाहीर केली, जी देशात हिंदूंविरुद्ध द्वेष आणि कट्टरता निर्माण होणार नाही याची खात्री करण्यासाठी समविचारी कायदेकर्त्यांना एकत्र आणेल. मिशिगनच्या 13 व्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ठाणेदार यांनी बुधवारी कॅपिटल व्हिजिटर सेंटर येथे पहिल्या हिंदू-अमेरिकन समिटमध्ये ही घोषणा केली. (हेही वाचा: अनेक यूएस फेडरल सरकारी संस्थांना जागतिक सायबर हल्ल्याचा फटका; प्रभाव समजून घेण्यासाठी CISA करत आहे काम)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)