अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी त्यांना मंगळवारी अटक होऊ शकते असा दावा आपल्या सोशल मिडीयाच्या (Social Media) पोस्टमधून केला आहे. माझ्या समर्थकांनी या विरोधात निषेध नोंदवावा असे देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. न्यूयॉर्कच्या काही सरकारी संस्था महिलांना दिलेल्या पैशांशी संबंधित प्रकरणाची चौकशी करत आहेत. या प्रकरणी त्यांना अटक होऊ शकते. असे त्यांना वाटत आहे. आपल्याला गुप्तचरांकडून ही माहिती मिळाल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

पहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)